प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यावर दगडाने वार करून केली निर्घुण हत्त्या आणि मृतदेह…..
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | PALGHAR | BOYFRIEND KILLED HIS GIRLFRIEND AND THREW HER BODY IN THE CREEK | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
पालघर: प्रेयसीच्या घरातून प्रेमसंबंधाला विरोध असल्याचे कारण मनात ठेवून रागाच्या भरात प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघर तालुक्यातील मुरबे येथे घडली आहे. स्नेहा पुरुषोत्तम चौधरी (वय १९) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर प्रियकराचे नाव सुमित तांडेल (वय २१) असे आहे. आरोपी प्रियकर प्रेयसीची हत्या करून फरार झाला होता. सोमवारी संध्याकाळी सातपाटी येथून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
मृतदेह खाजन परीसरात….
स्नेहा चौधरी आणि तिचा प्रियकर सुमित तांडेल हे मुरबे या एकाच गावात राहणारे असून तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात काम करत होते. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी ८ वाजेच्या सुमारास दोघेही आपापल्या घरातून कामावर जाण्यासाठी निघाले होते. पण मध्येच कुंभवली गावाजवळ रस्त्यात दोघांमध्ये भांडण सुरू झाले होते. या भांडणादरम्यान सुमितने स्नेहाच्या डोक्यावर दगडाने वार करून तिला रक्तबंबाळ केले होते. या दरम्यान तिथे जमलेल्या नागरिकांना दोघांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी स्नेहाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जातो असे सांगून सुमित तांडेल हा स्नेहा हिला दुचाकीवर बसवून एकलारे गावाजवळील खाडीच्या खाजण परीसरात घेऊन गेला होता. दोघांमध्ये भांडण झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी मुलीचे कुटुंबीय आणि पोलिसांना दिल्यानंतर बोईसर पोलिसांनी स्थानिक नागरिकांसह खाजन परीसरात शोधमोहीम सुरू केली. दुपारी २ वाजेच्या सुमारास स्नेहा चौधरी हिचा मृतदेह खाजन परीसरात सापडला आहे. लाल रंगाचे कपडे आणि काळ्या रंगाची बॅग यावरून तिची ओळख पटविण्यात आली आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
पोलिसांनी आरोपीला तत्काळ घेतले ताब्यात….
बोईसर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत खून करून पसार झालेला आरोपी सुमित तांडेल याला सातपाटी येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. तर स्नेहाचा मृतदेह शविच्छेदनासाठी तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष पवार हे अधिक तपास करीत आहेत. स्नेहा चौधरी आणि सुमित तांडेल हे मुरबे येथे शेजारी राहत होते. स्नेहा हिच्या मोठ्या बहिणीचा तीन दिवसांपूर्वीच साखरपुडा पार पडला होता तर स्नेहा आणि सुमित यांच्या प्रेमसंबंधास स्नेहाच्या कुटुंबीयांचा मोठा विरोध होता. त्याच रागातून सुमित याने स्नेहाची हत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.