मनोज जरांगेंवर आधारित संघर्षयोद्धा या चित्रपटात छगन भुजबळांचे पात्र नकारात्मक,आपल्या पात्राबद्दल भुजबळांनी प्रतिक्रिया देणे टाळले….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MUMBAI | MARATHI FILM INDUSTRY | FILM STRUGGLE MANOJ JARANGE PATIL | CHHAGAN BHUJBAL | MANOJ JARANGE | ADV. GUNARATNA SADAVARTE | CHHAGAN BHUJBAL'S CHARACTER IS PORTRAYED IN A SOMEWHAT NEGATIVE WAY IN THE FILM, FOR THE FIRST TIME CHHAGAN BHUJBAL'S REACTION | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
मनोज जरांगे यांच्यावर आधारित संघर्षयोद्धा या सिनेमात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची देखील भूमिका आहे. आता या सगळ्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांच्या ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीला छगन भुजबळ यांनी विरोध केला होता. त्याचवेळी राज्यातील ओबीसी नेत्यांनी ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध करण्यासाठी राज्यभरात सभा देखील घेतल्या होत्या. त्यामध्येही भुजबळांनी केलेले भाषण चांगलेच गाजले होते. मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात प्रचंड वादविवाद झाले होते. उभय नेत्यांनी एकमेकांवर खालच्या पातळीला जाऊन टीका केली होती. साहजिकच यामुळे चित्रपटात छगन भुजबळ यांचे पात्र काहीसे नकारात्मक पद्धतीने रंगवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
चित्रपटात छगन भुजबळ यांचे पात्र काहीसे नकारात्मक….
दरम्यान सिनेमात देखील भुजबळांच्या भाषणाचा भाग दाखवण्यात आला आहे. परस्परांवर टीकास्त्र हे वैयक्तिक आणि खालच्या पातळीवर जाऊ लागले होते. पण तरीही ओबीसीतूनच आरक्षण घेण्यावर मनोज जरांगे आणि ओबीसीतून आरक्षण न देण्यावर छगन भुजबळ ठाम आहेत. हाच संघर्ष या सिनेमातूनही दाखवण्यात आला आहे. संघर्षयोद्धा या सिनेमावर प्रश्न विचारला असता भुजबळांनी म्हटले आहे की, मला त्यावर काहीही बोलायचे नाही. त्यांना काय दाखवायचे ते दाखवू द्या. त्यामुळे सिनेमातील भूमिकेवर भुजबळांनी प्रतिक्रिया देणे टाळल्याचे पाहायला मिळाले आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
मनोज जरांगे यांची भूमिकेत अभिनेता रोहन पाटील….
या चित्रपटात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या भूमिका कोण करणार ? याची कमालीची उत्सुकता अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना लागली होती. या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये छगन भुजबळ यांची भूमिका अभिनेते संजय कुलकर्णी तर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका शिवाजी दोलताडे यांनी साकारली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.