TIMES OF NAGAR
नगर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन श्रीरामपूर शहरात करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार समारंभात नगरचे सुपुत्र ॲड. रोमान सय्यद (बी. एस. एल. , एल. एल. बी. , सी.सी. एफ. एम.जे.क्रिमिनल विधीज्ञ, वैद्यकीय कायदेशीर तज्ञ ) यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय ज्येष्ठ विधीज्ञ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या बद्दल ॲड. रोमान सय्यद यांचे शहरातून कौतुक करण्यात येत आहे.
ॲड. रोमान सय्यद यांचे तोंडभरून कौतुक
आपणास सन्मानित करतांना विशेष अत्यानंद होत आहे की, गेल्या २३ वर्षांपासून प्रदिर्घ अनुभव आणि न्यायालयात एक ज्येष्ठ विधीज्ञ म्हणून आपण कार्यरत आहात. सत्य , निर्भीड , सडेतोड , धाडसी वृत्ती आणि प्रामाणिक कार्यामुळे आपण सर्व परिचित आहात. वंचितांना , दुर्बलांना आपण संविधानाच्या आधारे न्याय मिळवून देण्याचे पवित्र कार्य सातत्याने करीत आहात. अत्याचारित व्यक्तींसाठी तसेच जुलूम अन्यायाच्या विरोधात आपण कायमच कठोर भूमिका घेतलेली दिसून येते. आपली आंतरिक तळमळ आणि स्वतःला झोकून देऊन काम करण्याची वृत्ती अनेकांना न्याय मिळवून देणारी ठरली आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्हा न्यायालये,उच्च न्यायालयात आपण अतिशय प्रभावी आणि निःपक्षपातीपणे आपली सत्याची बाजू मांडलेली दिसून येते.असंख्य अत्याचारित व्यक्तींना आपण कायद्याच्या भाषेतच उत्तर देऊन गजाआड करून अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे. अनेक निष्पाप लोकांच्या सदैव पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहून कोणत्याही आमिषाला अथवा दबावाला बळी न पडता आपले न्यायालयीन कार्य अविरतपणे सुरू आहे. महाराष्ट्र राज्य आणि इतर राज्यांमध्ये देखील आपली ख्याती आहे. २००० हून अधिक न्यायालयीन खटले आपण चालवून सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला आहे. दंगली सारख्या प्रकरणात देखील निरपराध व्यक्तींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांची निर्दोष मुक्तता आपण केली हे गौरवास्पद आहे.
Video Player
00:00
00:00