TIMES OF AHMEDNAGAR
राम मंदिराबाबत भारतीयांसोबतच परदेशीही उत्सुक आहेत. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने राम मंदिराबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.ती पोस्ट सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा बद्दल सध्या देशभरात उत्साह आहे. सध्या देशाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्त वेगवेगळ्या मार्गाने अयोध्येत येत आहेत. भाविकांची गर्दी पाहून २२ जानेवारीनंतर रामलल्लाचे दर्शन घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. अशातच पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.
पाकिस्तानात राम मंदिराचा उत्साह !
भारताच्या शेजारी देश पाकिस्तानमध्येही राम मंदिराचा उत्साह दिसून येत आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर दानिश कनेरियाने रामलल्लाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने एक्सवर पोस्ट शेअर करताना लिहले माझे रामलल्ला विराजमान झाले.गुरुवारी राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाच्या नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यापूर्वीही दानिश कनेरियाने राम मंदिरावर अनेकदा प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी त्यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी विशेष सुट्टी दिल्याबद्दल मॉरिशस सरकारचे आभार मानले होते. याशिवाय कनेरियाची एक्सवर फॅनशी चकमकही झाली.
फहीम नावाच्या व्यक्तीने कनेरियाच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना लिहले आहे कि ‘चोर कधीच मालिक बनू शकत नाही.’ यासोबत त्याने बाबरी मशीद पाडल्याचा फोटो शेअर केला होता. यावर कनेरियानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले आणि म्हटले त्यामुळेच आता त्याच्या हक्काच्या मालकांनी बाबराकडून त्यांचे मंदिर परत घेतले.
कनेरियाने सांगितले होते की, मी प्रतिष्ठापनेची आतुरतेने वाट पाहत आहे. हातात भगवा झेंडा घेऊन त्यांनी आपला फोटो शेअर केला आहे. आपला फोटो शेअर करताना दानिश कनेरियाने लिहिले की, ‘आमचे राजा श्री रामचे भव्य मंदिर तयार आहे, आता प्रतीक्षा फक्त काही दिवसांची आहे! बोला जय जय श्री राम.’