महिला शौचालयाला असतांना त्यांचे चित्रण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी,उपोषणकर्त्या महिलेसोबत असे घडले असे कि …….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | HOME MINISTER | DEVENDRA FADNAVIS MAHARASHTRA POLICE | DIRECTOR GENERAL OF POLICE | DISTRICT SUPERINTENDENT OF POLICE | AHMEDNAGAR DISTRICT | AHMEDNAGAR | PATHARDI | TISGAON | VASANTRAO SAKAT | DISTRICT SUPERINTENDENT OF POLICE | PATHARDI POLICE | STRANGE DEPICTION OF WOMEN | FASTING IN FRONT OF THE COLLECTOR'S OFFICETHE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर – जिल्ह्यातील गुन्हेगारी हि सर्रास पणे सुरूच आहे. या गुन्हेगारीत तरुणांचा जीव जातो हे काही नवल नसल्याचे चित्र सध्या वाढत्या गुन्हेगारीतून स्पष्ट होते. तर जिल्ह्यात महिला देखील सुरक्षित नाहीत. काही टवाळखोरांनी तर थेट महिलांचे शौचालयाचे चित्रीकरण करण्याचा धंदाच सुरु केला असल्याचे समजते. गावातील वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिसगाव ता.पाथर्डी येथील महिलांनी बहुजन समता पार्टीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वसंतराव सकट यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय,अहमदनगर येथे उपोषण सुरु केले आहे. मात्र अद्यापही प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा न्याय दिला नसल्याचे गंभीर आरोप सकट यांनी केले आहेत.
स्त्रोत.सोशल मिडिया.
महिलांचे शौचालयाचे चित्रीकरण ?
भारत देश हा जागतिक महासत्तेचे स्वप्न पाहत आहे. भारत देश हा महासत्ता झालाच पाहिजे असे स्वप्न प्रत्येक भारतीयाचे आहे. मात्र भारताने स्वच्छ सुंदर राहिले पाहिजे असेहि मत युवक व्यक्त करतात. शासन सर्वसामान्य जनतेला फक्त आश्वासन देत आहे. खेडेगावांमध्ये नागरिकांना आजही मुलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे समजते. काही गावांमध्ये सार्वजनिक शौचालयांच्या नावाखाली शासनाकडून मोठा निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र स्थानिक पातळीवर तो निधी दुसऱ्याच मार्गाने तिसरीकडेच वळवला जातो. तसाच एक प्रकार मौजे तिसगाव तालुका पाथर्डी येथे घडला असल्याचे समजते. तिसगाव तालुका पाथर्डी येथे सार्वजनिक शौचालय नसल्याने येथील महिलांना पर्यायी मार्ग म्हणून उघड्यावर शौचालयाला जावे लागते. महिला शौचालयाला जात असतांना महिलांचे ड्रोनच्या (हावेत उडणारा कॅमेरा ) सहाय्याने विचित्र चित्रीकरण काही टुकार टोळी करत आहे. महिलांचे विचित्र चित्रीकरण होत असल्याचे समजताच महिलांनी याची संबंधित जबाबदार व्यक्तींकडे तक्रार केली. या टुकार टोळ्यांना गावकऱ्यांनी चांगलाच चोप दिला.