जुना काळ बाजूला ठेवा, आता नवीन काळ पाहा. सासूचे चार दिवस संपले आता सुनेचे चार दिवस येवूद्या.अजित पवारांची शरद पवारांवर टीका.
TIMES OF AHMEDNAGAR | INDIA | FORMER CHIEF MINISTER SHARAD PAWAR | DEPUTY CHIEF MINISTER AJIT PAWAR | MP SUPRIYA SULE SUNETRA PAWAR | BARAMATI LOK SABHA CONSTITUENCY | AJIT PAWAR VS SHARAD PAWAR | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. दोन्ही उमेदवारांकडून सध्या दणक्यात प्रचार सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज बारामती मतदारसंघात सभा पार पडली. या सभेत बोलताना अजित पवारांनी चुलते शरद पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
मग ४० वर्ष झाले तरी बाहेरची कशी ?
काही वडीलधारे जुना काळ आठवत असतील तर त्यांना म्हणा की जुना काळ बाजूला ठेवा, आता नवीन काळ पाहा. सासूचे चार दिवस संपले आता सुनेचे चार दिवस येवूद्या. नुसते सासू सासू… मग सुनेने काय नुसते बघत बसायचे का ? आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे पाहतो. मग ४० वर्ष झाले तरी बाहेरची कशी ? किती वर्ष झाल्यावर या घरची ते सांगा ?असा टोला अजित पवार यांनी नाव न घेता शरद पवार यांना लगावला.
स्त्रोत.सोशल मिडिया.
अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका.
मी एक वेगळी भूमिका घेतली. मी एकटा नाही तर हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील आणि ८० टक्के पेक्षा जास्त आमदारांनी ही भूमिका स्वीकारली. याचे कारण आपले प्रश्न सुटावे. गेल्या १२ वर्षात केंद्र सरकारचा बारामती मतदारसंघात निधी आलेला नाही असे म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्यावर देखील निशाणा साधला.
अजित पवार पुढे म्हणाले या सभेला बसलेले काही लोक आज माझ्या सभेला आले. मी ज्यांच्या विरोधात लढतो आहे ते आले की त्यांच्याही सभेला जातील. पण दोन डगरीवर हात कशाला ? आपल्याकडे एक पद्धत आहे कुंकू एकाचेच लावायचे असते. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे. आता जे लोक तुम्हाला ओळखतही नव्हते, ते पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. काहीजण भावनिक मुद्दा करतील, पण तुम्ही वेगळा विचार करु नका. विधानसभेला बघू असे म्हणताण आणि तुमच्या पायावर धोंडा पाडून घेताल असे अजित पवार म्हणाले.