खासदार सुप्रिया सुळेंच्या निलंबनावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं परखड भाष्य :
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधीपक्षाच्या जवळपास दीडशे खासदारांचं लोकसभा आणि राज्यसभेतून निलंबन करण्यात आलं आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं खासदारांचं निलंबन झाल्यामुळे देशभरातून यावर टीका केली जात आहे. निलंबन केलेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे. सुप्रिया सुळेंच्या निलंबनावर सुळेंचे मोठे भाऊ व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांच प्रतिक्रिया दिली.
अजित पवार सुप्रिया सुळेंच्या निलंबनावर काय म्हणाले ?
सुप्रिया सुळेंच्या निलंबनाबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले, फक्त सुप्रिया सुळेंचं निलंबन झालं नाही. अनेक खासदारांचं निलंबन झालं आहे. जेव्हा खासदार किंवा आमदार लोकसभेत,विधिमंडळांत, आणि राज्यसभेत काम करत असतात. त्यावेळी कुठल्या तरी नियमाचा भंग झाल्यास त्याप्रमाणे कारवाई केली जाते.