Reading:हायकोर्टाने करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्या पत्नी ठरवत त्यांना महिन्याला २ लाख रुपयांची पोटगी देण्याचे आव्हान ; करुणा शर्मा आज कोर्टात नवरा-बायको असल्याचे पुरावे…
हायकोर्टाने करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्या पत्नी ठरवत त्यांना महिन्याला २ लाख रुपयांची पोटगी देण्याचे आव्हान ; करुणा शर्मा आज कोर्टात नवरा-बायको असल्याचे पुरावे…
मुंबई: राज्याचे माजी मंत्री आणि अजितदादा गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्याबाबत करुणा शर्मा यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. माझ्याकडेच काय धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्याकडेही लग्नाचे प्रमाणपत्र नाही असा दावा करुणा शर्मा यांनी केला. त्या शनिवारी (दि.३०) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी करुणा शर्मा यांनी केलेल्या नव्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने गेल्या सुनावणीत करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांची पत्नी ठरवत महिन्याला २लाख रुपयांची पोटगी देण्याचे निर्देश दिले होते. मात्र करुणा शर्मा यांनी आपल्याला महिन्याला १५ लाख रुपयांची पोटगी हवी असल्याचे म्हटले होते. तर धनंजय मुंडे यांनी आपण करुणा शर्मा यांच्याशी लग्न केल्याचा दावा फेटाळला होता. त्यामुळे न्यायालयाने करुणा शर्मा यांना लग्नाचे पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आपण आज न्यायालयात पुरावे सादर करणार असल्याचे करुणा शर्मा यांनी सांगितले. माझ्याकडे खूप पुरावे आहेत. एखाद्या नवरा-बायकोच्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या माझ्याकडे आहेत. परळी पोलीस स्थानकात देखील मी पुरावे दिले होते. फोटो आणि व्हीडिओ सर्वच आहेत ते सर्व कोर्टात सादर करणार आहेत. आमच्या लग्नासंदर्भातील सर्व पुरावे मी कोर्टात देईन. जे पुरावे राजश्रीकडे नाहीत ते माझ्याकडे आहेत. लग्नाचे सर्टिफिकेट माझ्याकडे जरी नसलं तरी ते राजश्रीकडे देखील नाही. आमचं लग्न मंदिरात झालं त्यावेळी त्यांचे लोक आणि आमचे लोक होते. राजश्री आणि धनंजय मुंडेंचं लग्नही तसंच झालं होतं. त्याकाळात लग्नाचे सर्टिफिकेट नव्हते. मात्र माझ्याकडे इतर पुरावे आहेत असे करुणा शर्मा यांनी ठणकावून सांगितले आहे.
(संग्रहित दृश्य.)
धनंजय मुंडे ऑपरेशनच्या नावाने फॅशन शो बघायला गेले: करुणा शर्मा
धनंजय मुंडे हा खोटारडा माणूस आहे. ते सर्व जगाने ते पाहिलं आहे. सर्वात आधी त्याने ट्विट करत सांगितलं की मी बीडला जाऊ नाही शकलो. कारण मला मुंबईला रुग्णालयात ऑपरेशनसाठी भरती व्हायचे आहे. पण धनंजय मुंडे हा व्यक्ती फॅशन शो पाहायला गेला होता. म्हणजे हा किती खोटारडा माणूस आहे. मी सर्वच पुरावे देणार आहे. कोर्टाने मला मागितले नाही तरीही देईल. २०१६ सालचं मृत्यूपत्र आहे ते देखील मी कोर्टात सादर करणार आहे असे करुणा शर्मा यांनी सांगितले आहे .