प्रशासनाच्या तानाजीची तानाशाही , प्रशासनाची भूमिका संशयास्पद ?
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | AHMEDNAGAR POLICE | DISTRICT SUPERINTENDENT OF POLICE, AHMEDNAGAR KOTWALI POLICE STATION | POLICE OFFICER TANAJI PAWAR | MNS AGGRESSIVE THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर – शहरात अनेक खुनी हल्ले, वेळप्रसंगी खून, चोऱ्या , दरोडे अशा भीतीदायक घटना घडत आहेत. शहरातील नागरिक सुरक्षित आहेत का असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.थोडक्यात शहरात दहशत माजली आहेच याला नव्याने सांगण्याची गरज नाही.
स्त्रोत.सोशल मिडिया.
प्रशासनाची भूमिका संशयास्पद ?
अहमदनगर जिल्ह्यासह शहरात गुंडांनी दहशत माजवली आहे. अनेक खुनी हल्ले या शहरात घडत आहेत. मात्र प्रशासनाच्या भूमिकेवर अनेक राजकारण्यांनी संशय व्यक्त करत ताशेरे ओढले आहेत. जिल्ह्यासह शहरात देखील प्रशासनाचा धाक दिसून येत नसल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनेवरून स्पष्ट होते. काल शनिवार (दि.१० फेब्रुवारी) रोजी अहमदनगर शहरातील प्रसिद्ध उद्योजक धीरज जोशी यांच्यावर गुलमोहर रोड येथे प्राणघातक हल्ला झाला. तर शनिवार (दि.१० फेब्रुवारी) रोजी भिंगार येथे एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाला.शहरातले हल्ले थांबण्यास प्रशासन असक्षम असल्याचे समजते. प्रसिद्ध उद्योजक धीरज जोशी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी चंद्रकांत उजागरे,मतीन शेख,अशा काही राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर देखील प्राणघातक हल्ले झाले आहेत.मात्र या हल्ल्यांच्या तपासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक का नेमले गेले नाही असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.प्रशासनाने सर्वच नागरिकांना संरक्षण दिले पाहिजे आणि कोणत्याही व्यक्त्तीवर झाल्लेल्या अत्याचाराचा पूर्णपणे शोध लावला पाहिजे प्रशासनाने कोणताही दुजाभाव न करता तपास करणे गरजेचे असल्याचे स्थानिक रहिवासी दबक्या आवाजात चर्चा करत आहेत.
स्त्रोत.सोशल मिडिया.
पोलीस प्रशासनाची दहशत तरी कमी होईल का ?
कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले तानाजी पवार यांनी काही दिवसांपूर्वी एका मनसेच्या कार्यकर्त्याचा बदडले होते. पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार मनसेचे किरण रोकडे यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांकडे केली होती.किरण रोकडे यांचे मित्र सनी भुजबळ यांना मारहाण झाली होती. त्या साठी कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी रोकडे कोतवाली पोलीस ठाण्यात गेले होते. पोलीस निरीक्षकांची भेट घेतल्यानंतर रोकडे यांना बाहेर बसण्याचे सांगण्यात आले. बाहेर बसले असतांना तानाजी पवार हे पोलीस कर्मचारी तेथे आले आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली. आणि ताबडतोब येथून निघून जा अन्यथा तुला खोट्या गुन्हात अडकवू अशी धमकी दिली आणि तानाजी काय आहे हे तुला दाखवून देऊ असा दम दिला असा आरोप किरण रोकडे यांनी केला आहे.