By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला हलक्यात घेऊ नका, महायुतीमधील त्यांच्या मित्रपक्षांना अजित पवार गटाचा इशारा….
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > राजकारण > राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला हलक्यात घेऊ नका, महायुतीमधील त्यांच्या मित्रपक्षांना अजित पवार गटाचा इशारा….
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला हलक्यात घेऊ नका, महायुतीमधील त्यांच्या मित्रपक्षांना अजित पवार गटाचा इशारा….

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | POLITICS | SHINDE GROUP | AJIT PAWAR GROUP | AMONG THE LEADERS OF MAHAYUTI, THERE IS A DISPUTE AMONG THEMSELVES OVER THE POST OF CHIEF MINISTER | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/06/27 at 5:17 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

माझ्या पक्षाचा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी आमच्या पक्षाकडे अजित पवारांसारखा आश्वासक चेहरा आहे. असेही मिटकरी यांनी म्हटले आहे. तसेच मिटकरी यांनी महायुतीमधील त्यांच्या मित्रपक्षांना (भाजपा – शिवसेनेचा शिंदे गट) सूचक इशारा दिला आहे की आमच्या पक्षाला हलक्यात घेऊ नका. दरम्यान, शिवसेनेच्या शिंदे गटाने अजित पवार गटाला प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे की राज्यातील जनतेला एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत. अमोल मिटकरी म्हणाले, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार आहे आणि मला वाटते की माझ्या पक्षाचा नेता महाराष्ट्र मुख्यमंत्री व्हावा. हीच माझी भूमिका आहे मुख्यमंत्रिपदासाठी अजित पवारांशिवाय आमच्या पक्षात दुसरे कोण आहे ? अजित पवार हेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहेत. आमचा पक्ष हा एक प्रादेशिक पक्ष आहे आणि आमची मोठी प्रादेशिक ताकद आहे. त्यामुळे मी आमच्या दोन्ही मित्रपक्षांना प्रसारमाध्यमांद्वारे अत्यंत नम्रपणे विनंती करतो की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला हलक्यात घेऊ नका.

ajit pawar ncp mla amol mitkari publicly expressed displeasure with bjp ppd  88 zws 70स्त्रोत सोशल मिडिया

आमच्या पक्षाला हलक्यात घेऊ नका – अमोल मिटकरी

शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड म्हणाले, उद्धव ठाकरे यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री म्हणून लोकांनी त्यांचा चेहरा पाहिला. परंतु, तो चेहरा कधी विधानभवनात दिसला नाही. ते कधी मंत्रालयात येत नव्हते. त्यामुळे त्या चेहऱ्याला महाराष्ट्रातील जनतेने घरी बसवले आहे. आता जनतेत जाणारा एकच चेहरा आहे. तो चेहरा म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते लोकांच्या सुखदुःखात सहभागी होतात. हा चेहरा महाराष्ट्रातील जनतेला घेऊन पुढे जात आहे. संजय गायकवाड यांनी संजय राऊत (शिवसेनेच्या ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार) यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनू शकतात, असे वक्तव्य राऊत यांनी केले होते. त्यावर संजय गायकवाड म्हणाले, तुम्ही उद्धव ठाकरे यांचा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर करत आहात. परंतु, काँग्रेस स्वबळाची भाषा करू लागली आहे. यामुळे महाविकास आघाडीत बिघाड झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कोणताही चेहरा घेऊन निवडणूक लढू शकणार नाही. मुळात महाविकास आघाडीची एवढी क्षमता नाही.

You Might Also Like

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

तर राजकारणात त्याचे कसे तुकडे करायचे ठरवू , उद्धव ठाकरेंचा मातोश्री वर यल्गार ?

अजित पवार दोषी असेल तर फासावर लटकवा, वैष्णवी हागवणे मृत्यूप्रकरणी अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया ; म्हणाले असले नालायक लोक मला……

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात? प्रभाग रचना प्रक्रियेला सुरुवात

आगामी महापालिका महायुती म्हणून एकत्र लढणार, पण… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितल…

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article विधानभवनात फडणवीस आणि ठाकरेंची भेट, ठाकरे म्हणाले ना ना करते प्यार… तुम्ही से प्यार कर बैठे……
Next Article एका २४ वर्षीय महिलेचा अज्ञात व्यक्तीने घरात घुसून धारदार शस्राने केला खून.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?