अ.नगर : नगर शहरातील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांचेकडून १०० रु फी वारंवार घेणेच्या कारणाने संबंधित महिलेच्या पतीकडून रुग्णालयाची तोडफोड करत डॉ.प्रकाश कांकरिया यांच्या तोंडाला काळे फासल्याच्या प्रकरणातील १७ आरोपिंना विविध कलमान्वये एक वर्षाची कैद व ११ हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांनी या प्रकरणी आरोपिंना शिक्षा सुनावली आहे. शिक्षा झालेल्या आरोपींमध्ये संजीव बबनराव भोर (रा. पाइपलाइन रोड, अहिल्यानगर), महादेव परशुराम भगत (रा. कापूरवाडी), बलभीम परशुराम भगत (रा. कापुरवाडी), बाबासाहेब बाबुराव जरे (रा. इमामपूर), संतोष विठ्ठल वाडेकर (रा. देसवडे), आदिनाथ शंकरराव काळे (रा. वांजोळी), रमेश अशोक बाबर (रा. बाबर मळा), किशोर सुनील आर्डे (रा. बोल्हेगाव), अरूण बाबासाहेब ससे (रा. जेउर), संदीप उर्फ मेजर शंकर पवार (एम.आय.डी.सी.), शरद उर्फ बाळू गदाधर (एम.आय.डी.सी.), कैलास शिवाजी पठारे (जेऊर), योगेश उर्फ भावड्या गोविंद आर्डे (एम.आय.डी.सी.), गणेश उर्फ भैया जितेंद्र शिंदे (एम.आय.डी. सी.), विठ्ठल उमेश गुडेकर (एम.आय.डी.सी.), बापू बाबासाहेब विरकर (एम.आय.डी.सी.), सागर कडुबा घाणे (एम.आय.डी. सी.) यांचा समावेश आहे. तर यातील एक आरोपी मयत झाला आहे. २००८ मध्ये डॉ. प्रकाश कांकरिया यांच्या साईसूर्या नेत्रसेवा रुग्णालयात एका महिलेच्या तपासणीदरम्यान शंभर रुपयांच्या फी च्या वादातून तिच्या पतीने रुग्णालयात सामानाची मोडतोड केली होती. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात १७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार डॉक्टरांवर विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. विनयभंगाची तक्रार मिटविण्यासाठी महिलेच्या पतीने ११ लाख रुपयांची मागणी डॉक्टरांकडे करून त्यांना धमकी दिली होती. त्यानंतर २० ते २५ लोकांनी डॉ.कांकरिया यांच्या केबीनमध्ये घसून हॉस्पिटलचे नुकसान केले. व अपमानास्पद वागणूक दिली होती. या गुन्ह्यात सरकारी पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आलेल्या कागदोपत्री पुरावा, तोंडी पुरावा व सरकारी वकील अर्जुन पवार यांचा युक्तीवाद ग्राहय धरून न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली आहे.