चिचोंडी पाटील येथील नंदी मारुती वस्ती येथे अंगणवाडी सेविका यांच्यावर मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली होती. सौ. उमा महेश पवार या अंगणवाडी सेविका यांच्यावर अंगणवाडीमध्ये अमानुष अत्याचार करून त्यांचा निर्घृण खून केली व तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सदर घटनेमुळे चिचोंडी पाटील व परिसरामध्ये असुरक्षितेचे वातावरण तयार झाले आहे. महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न तीव्र स्वरूपात निर्माण झाला आहे.
(संग्रहित दृश्य.)
संपूर्ण गावाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन.
संपूर्ण गावाच्या व ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करून निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सरपंच शरद पवार , सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे, मा.सभापती प्रवीण कोकाटे,उपसरपंच यशोदा कोकाटे, योगीराज गाडे, अरुण म्हस्के, चंदू पवार, प्रशांत कांबळे, मच्छिंद्र खेडकर, वैभव कोकाटे, संतोष खराडे, भाऊसाहेब ठोंबरे, अंगणवाडी संघटनेच्या सचिव स्मिता सप्रे, औटी मॅडम, अंगणवाडी सेविका नंदा पवार, अशा चांदगुडे, दौपदी कोकाटे, नंदा ससे, सुरेखा खेडकर, मंदा कळमकर, किरण खराडे, आशा ठोंबरे, मंगल शेंदूरकर, लता मुटकुटे, अनिता इंगळे, सरस्वती कोकाटे, अलका तनपुरे, कमल पवार आदीसह चिचोंडी पाटील येथील अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे निवेदनात म्हटले आहे की, सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता खटला फास्टट्रॅक कोर्टात चालून पीडित महिलेच्या वतीने सरकारी वकील उज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी. सहा महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा तत्काळ द्यावी. यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावे तसेच पीडित कुटुंबाची जबाबदारी ही शासनाने घेऊन कुटुंबातील लहान दोन मुलांचे शिक्षण व पालन पोषणासाठी विशेष बाब म्हणून निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा. मयताचे पती हे नगर जिल्हा परिषद सेवेत कंत्राटी पद्धतीने कर्मचारी म्हणून काम करत असून त्यांना शासकीय सेवेत नियमित करावे तसेच जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रासाठी सेविका व मदतनीस दोन्ही पदाची मिनी अंगणवाडीसाठी तात्काळ नियुक्त करून सर्व अंगणवाडी केंद्रात विद्युत पुरवठ्यासह सीसीटीव्ही कॅमेरे व आलाराम बसवण्यात यावे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या मधील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावे व लाभार्थी पुरुष पालकांनी अंगणवाडी केंद्रामध्ये आपल्या पाल्याचा पोषण आहार नेण्यासाठी येऊ नये. महिलांना पाठवावे याबाबत आदेश काढण्यात यावे तसेच गावामध्ये बाहेरील तालुक्यातील जिल्ह्यातील परप्रांतीय अनोळखी व्यक्ती कामासाठी व इतर कारणासाठी राहायला आल्यास पोलीस प्रशासनाकडून त्याचे चारित्र्य पडताळणी होण्याची आवश्यकता होण्यासाठी गावातील अनेक वर्षां पासून बंद असलेली पोलीस चौकी ही लवकरात लवकर चालू व्हावी. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.