शक्तिप्रदर्शन करत माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांचा उमेदवारी अर्ज दाखल. नेवासा तालुक्याच्या विकासासाठी शिवसेनेची मशाल घराघरात पोहचविण्याचे आमदार शंकरराव गडाख यांचे कार्यकर्त्यांना आवाहन. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूव झालेल्या सभेत बोलतांना आमदार शंकरराव गडाख यांनी नेवासा तालुक्याच्या विकासासाठी शिवसेनेची मशाल घराघरात पोहचवा असे आवाहन केले. महाविकास आघाडीला जसे लोकसभेला यश मिळाले त्याच प्रमाणे यश या निवडणुकीत मिळणार असून राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त करत तालुक्याचे सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. असा निर्धार आमदार शंकरराव गडाख यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.आरोप करून हिडीस राजकारण करण्याचा विरोधकांचा डाव वेळीच ओळखा, विजयश्री प्राप्त करण्यासाठी आपआपसातील मतभेद मिटवा. असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.
(संग्रहित दृश्य.)
विजय प्राप्त करण्यासाठी आपआपसातील मतभेद मिटवा.
या प्रसंगी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, माजी आमदार पांडुरंग अभंग, अशोक गायकवाड, ॲड. अण्णासाहेब अंबाडे, भेंडा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, रामनाथ महाराज पवार, युवा शेतकरी विक्रम पवार, दादासाहेब चिमणे यांनी आपल्या भाषणातून तालुक्याच्या विकासासाठी शंकरराव गडाख यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी शिरसगाव येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी गडाख गटात प्रवेश केला. यावेळी मशाल पट्टी घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. नेवासा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यानंतर शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यासाठी हजारोंच्या उपस्थितीत रॅलीस प्रारंभ झाला.सदरची रॅली तहसीलदार कचेरीकडे निघाल्यानंतर गडाख साहेब तुम आगे बढो,हम तुम्हारे साथ है. अशा घोषणा यावेळी समर्थकांच्या वतीने देण्यात आल्या. यावेळी गडाख यांच्या समर्थकांनी गळ्यात मशाल चिन्ह असलेल्या भगव्या पट्ट्या गळ्यात घातल्या होत्या. तहसील कचेरीकडे जाणारा श्रीरामपूर रस्ता गदने व्यापला होता. मागच्या निवडणूकीत मला विजयश्री प्राप्त झाल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी मला शिवसेनेत प्रवेश देऊन मंत्री केले. अडीच वर्षाच्या मंत्री पदाच्या काळात मी मंत्री पदाची हवा डोक्यात जाऊ दिली नाही. उध्दव साहेबांचा स्वभाव मला आवडला म्हणून त्यांना साथ देण्याचा निर्णय मी घेतला. सत्ताबदल झाल्यानंतर विकास कामासाठी मंजूर झालेला निधी मला मिळू दिला नाही. अनेक मंजूर निधींना स्थगिती देण्याचे काम झाले. पालकमंत्री यांनी देखील निधी वाटपात नेवासा तालुक्यावर अन्याय केला असल्याचा आरोप त्यांनी केला. अजून दोन वर्षे मंत्रिपद राहिले असते तर वीज पाणी रस्ताचे प्रश्न सुटले असते याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.