निवडणूक आयोगाने विविध माध्यमांतून मतदार यादी शुद्धीकरणासाठी कार्यवाही सुरू केलेली आहे.
TIMES OF AHMEDNAGAR
कोणत्याही एका ठिकाणी नाव अपेक्षित आहे, हे ठरविण्याचा अधिकार मतदाराला दिला आहे. संबंधित मतदाराने ज्या ठिकाणी त्याचे नाव असणे त्यांना स्वतःला अभिप्रेत आहे त्या ठिकाणी बरोबरची खूण करावी आणि दिलेल्या ईमेल पत्त्यावर आधारकार्डच्या छायाप्रतीसह अपलोड करावे किंवा संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांची भेट घेवून त्यांच्यामार्फत पुष्टीकरण पत्रावर कार्यवाही करणे आवश्यक आहे. या मोहिमेनंतर दोन ठिकाणी मतदाराचे नाव आढळल्यास निवडणूक आयोगाच्या सुचनेप्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.