TIMES OF AHMEDNAGAR
अहमदनगर शहरात पोलीस आहेत कि नाही असा सवाल वारंवार नगरकरांच्या चर्चेचा विषय झाला आहे.अनेकदा मोठे नेते मंडळी देखील खासगीत पोलिसांच्या कारभारावर संताप व्यक्त करून स्वतःच्या जीवाची भीती वाटत असल्याचे खासगीत बोलतात. काही दिवसांपूर्वीच अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना का देतो याचा राग मनात धरून काही हल्लेखोरांनी शहरातील वकील हर्षद चावला यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. चावला यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात हल्लेखोरांवर कलम ३०७ सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र कोतवाली पोलीस ठाण्याच्या काही कर्मचाऱ्यांचे हॉटेल वैष्णवराजच्या अवैध धंद्यामध्ये पार्टनशिप असल्याचा आरोप फिर्यादी चावला यांनी केला होता. राज्य पोलीस महासंचालक व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात चावला यांनी योगेश भिंगारदिवे व गणेश धोत्रे या पोलीस कर्मचाऱ्यावर कलेक्शन करत असल्याचा आरोप करत हे पोलीस कर्मचारी आरोपींना घरी आश्रय देत असल्याचे म्हंटले होते.
मजुरी करणाऱ्या तरुणांवर जीवघेणा हल्ला.
काल मंगळवार २ डिसेंबर रोजी नागरदेवळे येथे काही गरीब मुलांवर भयंकर हल्ला झाला. उमेर लियाकत शेख,उजेर लियाकत शेख या तरुणांवर काही हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला होता. बांधकाम मजूर असलेले हे तरुण दैनंदिन कामकाज आवरून घरी आले असता अभिजित धाडगे,पुष्क्कर शेलार,उदय शेलार, (पूर्ण नाव माहित नाहीत) व इतर ७ ते ८ अनोळखी इसमांनी सर्व रा.नागरदेवळे यांनी लाकडी दांडके,लोखंडी रॉड,कोयता हातात घेऊन फिर्यादींच्या घरासमोर मोठमोठ्याने ओरडून शिवीगाळ केली. ए उजऱ्या ए उमऱ्या बाहेर ये तुला आता मारून टाकतो असे म्हणत उमेर व उजेर या दोन्ही भावांवर जीवघेणा हल्ला केला.या जीवघेणा हल्ल्यात दोघे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत.दोघांना जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते.मात्र दोघांची अवस्था पाहता त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
जखमी तरुणांची बिकट परिस्थिती.
नागरदेवळे येथे झालेल्या जीवघेणा हल्ल्यात दोन तरुण भाऊ जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात अधिकचा उपचार सुरु आहे. मात्र हे तरुण मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. हल्लेखोरांच्या हल्ल्यात या निष्पाप तरुणानाचा कोणताही दोष नसतांना त्यांना या हल्ल्यात जखमी व्हावे लागले. परंतु रुग्णालयात भरायला पैसे देखील या कुटुंबाकडे नसल्याचे समजते. अधिकच्या उपचाराच्या खर्चासाठी या तरुणांच्या कुटुंबीयाने सामाजिक मदतीचे आवाहन केले आहे.