By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: तब्बल दोन वर्षापासून एका अल्पवयीन मुलीवर प्रियकराचा आणि त्याच्या मित्रांचा लैंगिक अत्याचार आणि….
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > क्राईम न्यूज > तब्बल दोन वर्षापासून एका अल्पवयीन मुलीवर प्रियकराचा आणि त्याच्या मित्रांचा लैंगिक अत्याचार आणि….
क्राईम न्यूज

तब्बल दोन वर्षापासून एका अल्पवयीन मुलीवर प्रियकराचा आणि त्याच्या मित्रांचा लैंगिक अत्याचार आणि….

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | NAGPUR | A MINOR GIRL WAS GANG-RAPED BY HER BOYFRIEND AND HIS FRIENDS | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/05/30 at 2:42 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर प्रियकराने तिला मित्राच्या घरी नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच प्रियकराच्या तीन मित्रांनी बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रियकरासह चौघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन चारही आरोपींना अटक केली आहे.

बलात्कार कितने प्रकार के होते हैं? - Quoraस्त्रोत सोशल मिडिया

युवकांनी तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध ठे‌वले.

पीडित १७ वर्षांची मुलगी जरीपटक्यात राहते. तिच्या वस्तीत राहणाऱ्या एका युवकाशी तिची मैत्री झाली होती. काही दिवसांतच मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. त्या युवकाने तिला लग्न करण्याच्या आमिष दाखवले. त्यामुळे ती मुलगी त्या युवकासोबत फिरायला जात होती. ती मुलगी १५ वर्षांची असताना युवकाने तिला मित्राच्या घरी नेले. तेथे तीन मित्र पार्टी करीत होते. त्या मित्रांना घराच्या बाहेर बसवले आणि युवकाने घरात नेऊन मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दोन तासांनंतर युवकाने मित्रांना प्रेयसीची ओळख करून दिली आणि दोघेही निघून गेले. यानंतर तिचा प्रियकर काही महिन्यांसाठी कामाच्या शोधात गुजरातला गेला होता. प्रियकर गुजरातला गेल्यानंतर मुलीला प्रियकराच्या मित्रांनी गाठले. तिच्याशी मैत्री ठेवली. त्यानंतर तिघांनीही तिला शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. मात्र, तिने तिघांनाही नकार दिला होता. त्यामुळे तिनही मित्रांनी सांगितले की, ‘माझ्या घरी तुझ्यावर बलात्कार झाल्याची माहिती सर्वांना सांगेल. तसेच आईवडिलांनाही सांगून तुझी बदनामी करणार’ अशी धमकी दिली होती. बदनामीच्या भीतीने तिचा नाईलाज झाला होता. त्यानंतर तिनही युवकांनी तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध ठे‌वले होते. तसेच अनेकदा मुलीला फोन करून घरी बोलावण्यात येत होते. तिने घरी येण्यास नकार दिल्यास तिच्या घरी जाऊन तिला धमकावत होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून त्या मुलीवर चौघेही तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होते. यामुळे मुलगी तणावात राहायला लागली.

Chikhali Crime News : मासे विक्रेत्याकडे हप्ता मागत खुनी हल्ला; तिघांना अटक - MPCNEWSस्त्रोत सोशल मिडिया 

आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल.

तिच्या कुटुंबियांनी तिची आस्थेने चौकशी केली असता तिने चौघे जण वारंवार बलात्कार करीत असल्याची माहिती दिली. कुटुंबियांना धक्का बसला. तिला जरीपटका पोलीस ठाण्यात नेण्यात आले. जरीपटकाचे वरिष्ठ निरीक्षक दीपक भिताडे यांना घडलेला प्रकार सांगितला. पीडित मुलीने आरोपीविरुद्ध तक्रार केली. आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून चौघांनाही पोलिसांनी अटक केली.

You Might Also Like

लग्नाला तगादा लावणाऱ्या प्रियकराने प्रेयसीला संपवले ; आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला अन्…..

चक्क आरोपींकडूनच उकळली लाच ; एसीबीचीने मोठी कारवाई करत ३ पोलिसांना घेतलं ताब्यात. ! 

पत्नीने माहेरच्यांना बोलावून पतीला चोपलं ; अपहरण करून पतीला बेदम मारहाण करत हात-पाय मोडले.

त्या महिला डॉक्टरांचे AI च्या मदतीने बनवले अश्लिल व्हिडिओ ; गुन्हा दाखल.

खबरदार चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य कराल तर….. चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य करणाऱ्या प्रोफाइल धारकांची माहिती भारत सरकारला, ३५७ जणांवर गुन्हा दाखल.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry1
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article अपघाताच्या रात्री पोलिसांना कोणत्या मंत्र्याचा फोन आला , प्रकाश आंबेडकरांच्या त्या वक्तव्याने खळबळ ……..
Next Article मनुस्मृती व जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही,
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?