पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. मंगळवार (दि.२२) एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानी क्रिकेटपटू शहीद आफ्रिदीने आधी भारताकडे पाकिस्तानने हल्ला केल्याचे पुरावे मागितले आहेत. भारत स्वतःच आपल्या लोकांना मारतो आणि नंतर पाकिस्तानला दोष देतो असे विधान शाहिद आफ्रिदीने केले आहे. तसेच आफ्रिदीने भारतीय सैन्याचीही खिल्ली उडवली आहे. भारतात शोककळा पसरली असताना त्याचे हे वक्तव्य समोर आले आहे. पहलगाममध्ये चार दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्यांनी गोळीबार करण्यापूर्वी पर्यटकांचा धर्म विचारला असल्याचा काहींनी आरोप केल्यामुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे.
(संग्रहित दृश्य.)
कबड्डी संघ पाकिस्तानात खेळायला येतो पण क्रिकेट संघ येत नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये शाहिद आफ्रिदीने भारतावर मोठा आरोप करत म्हटले की दहशतवादी एक तास तिथे होते. आणि तुमच्याकडे ८ लाख सैन्य आहे पण तोपर्यंत कोणीही आले नाही आणि जेव्हा ते आले तेव्हा १० मिनिटांत त्यांनी पाकिस्तानला आरोपी ठरवले. ते स्वतःच लोकांना मारतात आणि नंतर ते स्वतःच त्यांचे व्हिडिओ दाखवतात आणि म्हणतात की ते जिवंत आहेत. आफ्रिदी पुढे म्हणाले की कोणताही धर्म दहशतवाद स्वीकारत नाही. आणि पाकिस्तान नेहमीच शांतीचा संदेश देतो. आम्ही नेहमीच भारताशी चांगले संबंध राखण्याचा प्रयत्न केला आहे. शाहिद आफ्रिदी पुढे म्हणाला की तुमचा कबड्डी संघ पाकिस्तानात खेळायला येतो पण क्रिकेट संघ येत नाही. जर तुम्हाला ते बंद करायचे असेल तर सर्वकाही बंद करा आणि जर तुम्हाला ते चालवायचे असेल तर ते पूर्णपणे चालू द्या असे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी याने म्हंटले आहे.