गुटखा सप्लायर आतिक डॉनच्या मुसक्या आवळण्यास भिंगार कॅम्प असक्षम ? आतिक म्हणतो मी पंटरला पाकीट दितोय, तो माझं काहीच करू शकत……!
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | ILLEGAL SALE OF GUTKHA | BHINGAR CAMP POLICE STATION | GUTKHA SELLER ATIQ | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर जिल्ह्यात अनेक अवैध कारभारांचा सुळसुळाट आहे. जिल्ह्याभरात वाळू तस्करी, गांजाची शेती, महिलांची लुटमार , धूम स्टाईलने महिलांचे मंगळसूत्र लंपास करणे, सुगंधित तंबाखू विक्री, लोखंडी सळई चोरी, असे अनेक अवैध धंदे जोरदार सुरूच आहेत. मात्र या अवैध धंधे चालकांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाला भीती वाटत आहे का ? असा सवाल वारंवार उपस्थित होत आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
भिंगार पोलीस ठाण्याच्या त्या पंटरचे अतिकला बळ ?
जिल्ह्याभरात सुरु असलेल्या अवैध गुटखा विक्रीचे मजबूत उत्पन्न पाहता अहमदनगर शहरात देखील गुटखा विक्रीचा मोठा कारभार सुरु आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील एक पंटर आपल्या सोबत असल्याने आपल्याला भीती नसल्याचे गृहीत धरून आतिक नामक एक तरुण सुगंधित तंबाखू, हिरा गुटखा, विमल गुटखा अशा प्रकारचा गुटखा शहरात विक्री करत आहे. महत्वाचे म्हणजे तो विक्री करत असलेला गुटखा हा महाराष्ट्रात बंदी आहे. मात्र अल्पवयीन मुलांना हाताशी धरून आतिक आपल्या अवैध गुटखा विक्रीचे जाळे शहरभर पसरवत आहे.मात्र या अतिकला सहकार्य करणारा पंटर कोण ? अतिकचे जाळे शहरभर पसरले आहे तो भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आपला अवैध कारभार चालवत असून देखील भिंगार पोलीस त्याच्यावर कारवाई का करत नाही ? भिंगार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हिम्मत दाखवून अतिकच्या मुसक्या आवळतील का असा सवाल सध्या त्रस्त नागरिक खासगीत उपस्थित करत आहेत.
स्त्रोत.सोशल मिडीया.
किरकोळ टपरीवर छापा,अड्ड्यावर का नाही. ?
काही दिवसांपूर्वी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. संबंधित गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तीवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंद करण्यात आला होता. गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाई करून त्याला बेड्या ठोकल्याबद्दल भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक हे केलेच पाहिजे. मात्र जेथे छापा टाकला त्याच्या चार पाऊले पुढेच अतिकचा गुटख्याचा मोठा अड्डा होता. त्या अड्ड्यात लाखोंचा गुटखा साठा होता. मात्र या अतिकच्या अड्ड्यावर पोलीस का गेले नाही हा संशोधनाचा विषय आहे.अतिकला ताब्यात घेतांना पोलिसांवर कोणाचे दडपण आहे का ? जर अतिकला कोणाचेही कायदेशीर सहकार्य नाही तर मग पोलीस अतिकला अटक करून अवैध कारभार उद्वस्त करणार आहेत का ? या प्रश्नांनी सध्या सर्वसामान्य माणसाला पोलिसांबद्दल विचार करण्यास भाग पाडले आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.