मुंबईत काल जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा, अनेकजण गंभीर जखमी आणि काही जागीच ठार.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MUMBAI | 8 PEOPLE WERE KILLED AND 59 INJURED | WHEN A 100 FEET HOARDING FELL DUE TO HEAVY RAIN | TRAFFIC STOP | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
सोसाट्याचा वारा व वादळामुळे दिवसा रात्रीसारखा काळोख दिसून येत होता. त्यामुळे मुंबई विमानतळावरील वाहतूक ठप्प झाली होती. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाला आहे. घाटकोपर येथे १०० फूट उंच होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले आहे. त्याखाली अनेक वाहने दबली गेली असून, आठ जण ठार, तर ५९ जण जखमी झाले आहेत. वडाळा येथेही लोखंडी टॉवर कार पार्किंगवर कोसळला आहे. राज्य सरकारने मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. दबलेल्या ४७ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. अनेकांना गंभीर दुखापत झाली असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालिका ४० फूट होर्डिंग्ज उभारणीला परवानगी देते. परंतु कोसळलेले होर्डिंग १०० फुटांचे होते.
स्त्रोत सोशल मिडिया
मुंबई मेट्रोचा खोळंबा.
मुंबईतील घाटकोपर, वांद्रे, कुर्ला, धारावी परिसरात ताशी ६० किमी वेगाने वारे वाहत होते. मुंबईतील दादर, घाटकोपर परिसरातही वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला आहे. अचानक वातावरणात बदल झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहतूक सेवेवरही त्याचा परिणाम झाला आहे. दुसरीकडे मेट्रोच्या ओव्हरहेड वायवर बॅनर पडल्याने मुंबई मेट्रोचा खोळंबा झाला होता.
स्त्रोत सोशल मिडिया
वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता…
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, राज्यात पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव या भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.