मतदानाच्या दिवशी अहमदनगरमध्ये आरोपांच्या जोरदार फैरी, सुजय विखेंवर आरोप.
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | AHMEDNAGAR CONSTITUENCY | MP SUJAY VIKHE FORMER | MLA NILESH LANKA | MLA ROHIT PAWAR | BJP TALUKA PRESIDENT RAHUL SHINDE | SUJAY VIKHEN IS ACCUSED OF DISTRIBUTING MONEY IN VILLAGES| THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO
महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्याचे मतदान सुरु असून यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मतदानाच्या दिवशी अहमदनगरमध्ये आता आरोपांच्या जोरदार फैरी सुरु झाल्या आहेत. बारामतीप्रमाणे अहमदनगर लोकसभा मतदार संघात मतदानाच्या आदल्या रात्री पैशाचा पाऊस पडत असल्याचा आरोप नगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्यावर केला आहे. तसेच कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी गावागावात पाकीट वाटत असल्याचा आरोप सुजय विखेंवर केला आहे. यावर आता नगर दक्षिणचे महायुतीचे आमदार सुजय विखे यांनी निलेश लंके आणि रोहित पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
सुजय विखे यांचे रोहित पवारांना प्रतिउत्तर
पारनेरमधील भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे यामध्ये रस्त्यावरती पैसे पडलेले आहेत तर राहुल शिंदे गाडीच्या बाजूला उभा आहे तर राहुल शिंदे यांच्यावर पैसे वाटप करण्याचा आरोप राष्टवादी काँग्रेस शरद पवार गटाने केला आहे. याबाबत बोलताना महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी म्हटले की पारनेर मधील जो व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो एकाच बाजूचा असून खरा व्हिडिओ समोर येणे गरजेचे आहे. पैसे गाडीत नव्हे तर गाडी बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे पैसे कोणाचे आहेत हे सांगायची गरज नाही. अहमदनगर जिल्ह्यातील गुंडागिरीचे राज्य पारनेर मधील जनताच उध्वस्त करणार आहे अशी प्रतिक्रिया महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
आपण काय केलं ते पाहावं आणि नंतर दुसऱ्यावर टीका करावी.
रोहित पवार यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देताना त्यांनी सांगितले २०१९ मध्ये रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोच्या कर्मचाऱ्यांना पैसे वाटप करताना पकडले आहे. त्यांच्यावर आजही गुन्हा दाखल असल्याचा टोला सुजय विखे पाटील यांनी रोहित पवार यांना लगावला आहे. आपण काय केलं ते पाहावं आणि नंतर दुसऱ्यावर टीका टिप्पणी करावी असेही महायुतीचे उमेदवार सुजय विखेंनी म्हटले आहे.