“मतदान करणार नाही”, त्या गावातील गावकऱ्यांनी घेतला आक्रमक निर्णय.ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | LOK SABHA ELECTION 2024 | BEED DISTRICT | THE VILLAGERS DECIDED NOT TO VOTE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
लोकसभा निवडणुकीसाठी आज १३ मे सोमवारी सकाळी सात ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. एकीकडे निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन सज्ज झाले असून सर्वत्र मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर दुसरीकडे नेतेमंडळीवर नाराज असलेल्या एका गावाच्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
मतदान करणार नसल्याचा आक्रमक पवित्रा.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, नगर, शिर्डी, बीड या ठिकाणी मतदान होत आहे. अशातच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मतदारांनी मतदान करणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. केज तालुक्यातील कोरडेवाडी गावातील नागरिकांनी साठवण तलावाच्या प्रश्नावरून मतदानांवर बहिष्कार घातला आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कोरडेवाडी गावात २ हजार १३० मतदार आहेत. साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लावा तरच मतदान करणार असे केज तालुक्यातील ग्रामस्थांनी सांगितले आहे.