TIMES OF AHMEDNAGAR
तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप …..
तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पुरावे सादर करावेत, पुरावे मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल, अशी भूमिका फडणवीस यांनी घेतली होती.
देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. तलाठी भरतीत राज्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याबाबत विचारणा केली असता फडणवीस म्हणाले की, तलाठी भरती परीक्षा ही राज्यात अतिशय पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली. या परीक्षेत कोणताही गैरव्यवहार झाल्याचा पुरावा कोणीही दिल्यास त्याची चौकशी केली जाईल. पुरावे योग्य असल्यास चौकशी करून ही परीक्षा रद्द केली जाईल आणि दोषींवर कारवाईही केली जाईल.
तलाठी भरती परीक्षेत परीक्षार्थींना उत्तरे पुरवणारे रॅकेट –
तलाठी भरती परीक्षेत परीक्षार्थींना उत्तरे पुरवणारे रॅकेट छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. परीक्षा घेणाऱ्या टीसीएस या कंपनीच्या दोन कंत्राटी कामगारांनी हाउसकीपिंगचे काम करणाऱ्या महिलेला पैशाची लालूच देऊन परीक्षा सुरू असताना परीक्षार्थींना कागदावर उत्तरे लिहून देत उमेदवारांना कॉपी पुरवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.
याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिकलठाणा येथे आय ऑन परीक्षा केंद्राबाहेरून परीक्षार्थी असलेल्या उमेदवारांना उत्तरे पुरवणाऱ्या राजू भीमराव नागरे याला पोलिसांनी अटक केली होती. नागरे याच्या मोबाईलमधून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे, यामध्ये परीक्षा केंद्रावर टीसीएस तर्फे कंत्राटी पर्यवेक्षक म्हणून नेमलेल्या दोन कर्मचाऱ्यांसह एका महिलेचा समावेश या रॅकेटमध्ये असल्याचे समोर आले होते. यामध्ये बाली रमेश हिवराळे (वय ३० रा. ब्रिज वाडी), शाहरुख युनूस शेख (वय २७ रा. वैजापूर) पवन सुरेश शिरसाट (वय २६ राहणार सिडको) या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर विकी रोहिदास सोनवणे (वय ३० च रा. चौका) याच्या नावावर सिम कार्ड असलेल्या आरोपीला अटक केली आहे.
या रॅकेटमध्ये सक्रिय असलेली महिला आरोपी बाली हिवराळे ही सेंटरवर स्वच्छतेचे काम करते. प्रत्येकाची कसून चौकशी होत असताना महिला असल्यामुळे महिलेची कसून चौकशी होत नव्हती यामुळे बाली हिराळेही मोबाईल सोबत नेत असे. परीक्षा केंद्रावरील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या शौचालयामध्ये जाऊन ती मोबाईल मध्ये आलेली उत्तरे कागदावर लिहून ती कंत्राटी पर्यवेक्षकाकडे नेऊन देत असे. यातील पवन शिरसाठ टीसीएसचा कंत्राटी कर्मचारी असल्याने त्याच्या मामाची मुलगी हाउसकीपिंगसाठी कामावर होती. तो हाउसकीपिंग काम करणाऱ्या बालीकडे जाऊन उत्तर लिहिलेली चिठ्ठी परीक्षार्थींना आणून देत होता.
मास्टर कार्डचा वापर…