निलेश लंके आणि सुजय विखेंच्या निकालासाठी प्रतीक्षाच करावी लागणार, कारण ……
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | SOUTH LOK SABHA CONSTITUENCY | SUJAY VIKHE | NILESH LANKA | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर – नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे निलेश लंके तर महायुतीचे सुजय विखे हे दोन तगडे उमेदवार रिंगणात होते. “कम से कम दो लाख” चा नारा देत आपणच विजयी होणार असल्याचा आत्मविश्वास निलेश लंके यांनी व्यक्त केला होता. तर मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. विजय तर आमचाच असा आत्मविश्वास सुजय विखेंनी व्यक्त केला होता. आज (दी.४ जून) या दोन्ही नेत्यांच्या आत्मविश्वासाची परीक्षा आहे. या दोन्ही नेत्यांच्या मतमोजनीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभेची लढत अत्यंत चूरशीची झाली असल्याने याचे काय निकाल येतील याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहेत. आज ४ जून ला सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
निकाल जाहीर होण्यासाठी उशीर होणार. ?
नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी संदर्भात एक महत्वाची बातमी आहे. नगरचा खासदार कोण होणार विखे कि लंके हे जाणून घेण्यासाठी आता थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. हा निकाल जाहीर होण्यासाठी साधारणता ८ वाजणार असल्याचे समजते.जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सांगितले की लोकसभेचा जो निकाल आहे तो राऊंड नुसार होणार आहे. फेऱ्या अनेक आहेत. नगर शहरासाठी कमीतकमी २१ फेऱ्या आहेत. तर जास्तीत जास्त २७ फेऱ्या आहेत. त्यामुळे जर एका फेरीला सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास साधारण अर्धा तास पकडला तरी परिपूर्ण निकाल यायला साधारण ८ ते ९ तरी वाजतील असा अंदाज आहे.
(संग्रहित. स्त्रोत.सोशल मिडीया.)
ईव्हीएम मोजणी सुरु होईल तेव्हा मतदार संघानुसार निकाल कळेल.
दरम्यान प्रत्येक फेरीनंतर काय ट्रेंड आहे ते साधारण दुपारीपर्यंत कळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक राउंडचा निकाल टीव्हीमार्फत नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचाही प्रयत्न असेल असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचा परिपूर्ण निकाल जाहीर होण्यासाठी साधारण रात्री ८ ते ९ वाजतील असे म्हटले जात आहे. दरम्यान सकाळी पोस्टलची फेरी झाली त्यावेळी त्यात सुजय विखे हे आघाडीवर होते. त्यामुळे आता जेव्हा ईव्हीएम मोजणी सुरु होईल तेव्हा मतदार संघानुसार कोण पुढे असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.