पत्नीच्या कथित विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून पतीने तिचा गळा आवळून खून केला आणि नंतर स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यातून वाचल्यानंतर चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणलेल्या पतीने तिथेच फरशी पुसण्याचे लिक्विड प्राशन करत जीवन संपवले. ही दु:खद घटना (दि.१८) एप्रिल रोजी रात्री उशिरा घडली असून दुसऱ्या दिवशी पहाटे त्याचा मृत्यू झालाशरद रूपचंद चितळे (वय ३३) हे मूळचे नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील काळेगावचे रहिवासी होते. आणि सध्या पुणे जिल्ह्यातील तळवडे येथील माऊली हौसिंग सोसायटीत राहत होते. पत्नी कांचन (वय २६) ही आशा सेविका होती. शरद यांना पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांचा संशय होता ज्यातून ही दुर्दैवी घटना घडली. (दि.१३) एप्रिल रोजी पत्नी झोपेत असताना त्यांच्या सहा वर्षीय मुलीसमोरच त्याने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकाराचा साक्षीदार त्यांच्या केवळ सहा वर्षांच्या मुलीला व्हावा लागले. पप्पा मम्मीला मारू नका असे तिने रडत सांगताच ती घराबाहेर धावत गेली. तिच्या या हालचालीमुळे शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी वेळेवर हस्तक्षेप करत शरद यांना रुग्णालयात दाखल क
(संग्रहित दृश्य.)
पोलिस चौकशीत पत्नीच्या खुनाची कबुली…
शरद याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच पोलिसांनी चौकशी केली. त्यात त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिली. (दि.१८) एप्रिल रोजी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी त्याला चिखली पोलिस ठाण्यात नेले. तिथे स्वच्छतागृहात जाऊन त्याने फरशी धुण्याचे लिक्विड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यालाही वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान (दि.१९) एप्रिल रोजी पहाटे त्याचा मृत्यू झाला. शरद चितळे याचा मृत्यू पोलिस ठाण्याच्या आवारात झाल्यामुळे नियमानुसार शवविच्छेदन ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या पॅनेलकडून करण्यात आले. याचे तपशीलवार अहवाल लवकरच अपेक्षित आहेत. अशा प्रकरणांचा तपास ‘गुन्हे अन्वेषण विभागा’कडे (सीआयडी ) वर्ग केला जातो आणि शरद चितळे प्रकरणाचीही चौकशी (सीआयडी ) मार्फतच होणार आहे. या घटनेने एक लहान मुलगी आई-वडिलांविना अनाथ झाली आहे. तिच्यासाठी पुढील काळात आधार व्यवस्था, मानसिक आधार आणि संरक्षणाची मोठी गरज निर्माण झाली आहे. शासकीय आणि सामाजिक संस्था अशा मुलांसाठी पुढे येतील का, हेही महत्त्वाचे ठरनार आहे.