अजितदादांच्या राष्ट्रवादीला स्वबळावर लढायचे असेल तर, शोधावे लागणार नवीन नऊ भिडू…..
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | LEGISLATIVE ASSEMBLY ELECTION PREPARATION | GRAND ALLIANCE | DEPUTY CHIEF MINISTER AJIT PAWAR | DISCUSSION ABOUT NCP AJIT PAWAR GROUP ASSEMBLY ELECTION | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. डॅमेज स्विकारुन महायुती कात टाकणार आहे भाजपने दोन दिवसांपूर्वी आपल्या नेत्यांची बैठक घेतली आहे. शिंदे गटानेही विधानसभेबाबत कार्यकर्त्यांना सुचना केल्या आहेत. आता अजित दादांची राष्ट्रवादीनेही चाचपणी सुरु केली आहे. महायुतीत हे तिन्ही पक्ष एकत्र राहतील का, हा खरा प्रश्न आहे. छगन भुजबळांनी तर थेट ८०-९० जागांची मागणी केली आहे. शिवसेनाही तेवढ्याच जागा मागेल. या दोघांच्या अपेक्षा पूर्ण केल्यानंतर भाजपच्या वाट्याला किती जागा येतील व त्यानंतर महायुती टिकेल का, हाच खरा चर्चेचा विषय आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
अजितदादा गटाची स्वबळाची मानसिकता…
मंगळवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अहमदनगर दौरा केला होता. येथील बाराही विधानसभांचा आढावा घेतला. काही दिवसांनी स्वतः अजितदादाही नगर भेटीला येणार आहेत. याचाच अर्थ अवास्तव जागा मागणीमुळे महायुती टिकण्याच्या शक्यता कमी दिसत आहे. अजितदादा गटानेही सेकंड ऑप्शन म्हणून स्वबळाची मानसिकता केलेली दिसते. अजितदादा गट विधानसभा स्वतंत्र लढला तर नगर जिल्ह्यात त्यांचे कोण-कोण उमेदवार असतील, याच विषयाचा हा आढावा आहे. आता नगर जिल्ह्याचा विचार केला, तर गेल्यावेळी राष्ट्रवादीचे सहा आमदार निवडून आले होते. त्यापैकी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार व राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे व पारनेरचे माजी आमदार निलेश लंके हे शरद पवारांसोबत राहिले. तर कोपरगावचे आशुतोष काळे, अकोल्याचे किरण लहामटे, नगर शहराचे संग्राम जगताप हे आमदार अजितदादांसोबत आले होते. यावेळी राष्ट्रवादीला स्वबळावर लढायचे असेल तर, नगर जिल्ह्यात या तिघांचे तिकीट कायम ठेऊन, नवीन नऊ भिडू शोधावे लागणार आहेत.