वर्धा : विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असल्याने सर्वच पक्ष वाजतगाजत कामाला लागल्याचे दिसून येत असून बैठकांना उधाण आले आहे. काही इच्छुक उमेदवार तिकीट पक्के झाल्याचा दावा करीत आहेत. पण हेच हेरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे  यांनी अशा उत्साही संभाव्य उमेदवारांचे कान टोचले आहेत. आर्वी व धामणगाव या दोन विधानसभा क्षेत्राचा आढावा घेण्यास ते आले होते. आर्वीत बोलताना त्यांनी इच्छुकांना खडेबोल सुनावले आहे.

काणकोणात भाजप विरोधात मतदान : काँग्रेस - Marathi News | voting against bjp in canacona said congress | Latest goa News at Lokmat.com(संग्रहित दृश्य.)

लोकसभा निवडणुकीत मागे का पडलो, याचा विचार करीत कामाला लागा.

बावनकुळे म्हणाले कि, माझे तिकीट पक्के, असा दावा जर कोणी करीत असेल तर तो फेल समजा. छातीठोकपणे असा दावा करू नका. एकही तिकीट पक्के नाही असे समजा. आम्ही वरिष्ठ काय करायचे ते पाहून घेऊ, असा इशारेवजा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. तसेच बावनकुळे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मागे का पडलो, याचा विचार करीत कामाला लागा. आता प्रत्येक बुथवर किमान २० ते २५ मते वाढतील याचे नियोजन करा. लोकसभा निवडणुकीत संविधान मुद्दा मारक ठरेल, असे वाटले नव्हते. म्हणून पक्ष ठरवेल त्याप्रमाणे कार्य करावे लागेल.

या खास बैठकीत नेत्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. निवडक पदाधिकाऱ्यांना बोलण्याची संधी मिळाली. पक्षाच्या बैठकाच खूप होतात. त्यातच वेळ जातो. फिल्डवर काम करायला वेळच मिळत नाही. म्हणून काम कमी व चिंतनच अधिक असा प्रकार टाळला पाहिजे अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.