By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: आमच्यासारखे लोक तुरुंगात जाऊन आले,त्यामुळे आम्हाला माहीत आहे की टार्गेटवर कोण आहे. या सगळ्यात भाजपाच्या बिश्नोई गँग आहेत. संजय राउतांच्या विधानाने खळबळ.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > राजकारण > आमच्यासारखे लोक तुरुंगात जाऊन आले,त्यामुळे आम्हाला माहीत आहे की टार्गेटवर कोण आहे. या सगळ्यात भाजपाच्या बिश्नोई गँग आहेत. संजय राउतांच्या विधानाने खळबळ.
राजकारण

आमच्यासारखे लोक तुरुंगात जाऊन आले,त्यामुळे आम्हाला माहीत आहे की टार्गेटवर कोण आहे. या सगळ्यात भाजपाच्या बिश्नोई गँग आहेत. संजय राउतांच्या विधानाने खळबळ.

Last updated: 2024/10/18 at 2:01 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. २० नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. मात्र अद्याप जागावाटप जाहीर झालेलं नाही. जागावाटपावरुन काँग्रेस आणि महाविकास आघाडीतले इतर दोन पक्ष यांच्यात काही प्रमाणात मतभेद झाल्याची चर्चा आहे. याबाबत प्रश्न विचारला असता खासदार संजय राऊत म्हणाले जागा वाटपाची गाडी अडली आहे. भाजपाला हरवायचं असेल तर लवकरात लवकर जे काही पेच असतील ते सोडवले पाहिजेत. तसंच काँग्रेसला त्यांनी एक सल्लाही दिला आहे.

Sanjay Raut ।(संग्रहित दृश्य.)

भाजपाशी कसं लढायचं हे आम्हाला माहीत आहे.

आम्ही अशी अपेक्षा करतो की महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा वेगाने व्हावी आणि तातडीने निर्णयापर्यंत येण्याची गरज आहे. मला कारणांमध्ये पडायचं नाही पण नक्कीच २०० पेक्षा जास्त जागांवर आमची सहमती आहे. उरलेल्या जागांचा पेच निर्माण झाला आहे. त्यासंदर्भात माझी आज उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. कुणाच्या काय भूमिका आहे. हे त्यांना सांगितलं आहे. आज सकाळी मी वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केली. काँग्रेसचे रमेश चेन्नीथला यांच्याशी चर्चा केली आहे. राहुल गांधींशीही मी चर्चा करणार आहे. काही जागांवर गाडी अडली आहे त्यातून ब्रेक निघाला पाहिजे. ही आमची भूमिका आहे. असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रात प्रत्येक पक्षाला काँग्रेस  राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना सगळ्यांना पक्ष चालवायचे आहेत आणि टिकवायचे आहेत. त्यामुळे जागावाटपावरुन जास्त खेचाखेची बरी नाही हे आम्हालाही माहीत आहे. निर्णय लवकर झाले पाहिजेत कारण भाजपाचा आम्हाला पराभव करायचा आहे. भाजपाशी कसं लढायचं हे आम्हाला माहीत आहे. महाराष्ट्रात भाजपा  अमित शाह आणि मिंधे गटाने सर्वात जास्त त्रास शिवसेनेला दिला आहे. आमच्यासारखे लोक तुरुंगात जाऊन आले. त्यामुळे आम्हाला माहीत आहे की टार्गेटवर कोण आहे. या सगळ्या भाजपाच्या बिश्नोई गँग आहेत. आम्ही सगळा त्रास सहन करुन आम्ही उभे आहोत. असंही राऊत म्हणाले.

जनतेचा सरकारवर विश्वास नाही, म्हणून बदलापुरात जनतेचा आक्रोश आणि उद्रेक - संजय राऊत - Sanjay Raut on Badlapur(संग्रहित दृश्य.)

काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांना आम्ही विनंती केली.

काँग्रेसची एक यंत्रणा आहे. त्यांना यादी दिल्लीला पाठवावी लागते. आमचं असं म्हणणं आहे की हे निर्णय महाराष्ट्रात झाले तर फार वेगाने होतील. शिवसेना  राष्ट्रवादी यांचे पक्ष महाराष्ट्रात आहेत. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांना आम्ही विनंती केली आहे की तातडीने निर्णय घ्यावा. महाराष्ट्रातले काँग्रेस नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत असं दिसतं आहे.तसंच आम्ही हे सांगू इच्छितो  विदर्भ हा महाराष्ट्राचा भाग आहे ते काही स्वतंत्र संस्थान नाही. रामटेकसारखी सहावेळा निवडून आलेली जागा आम्ही काँग्रेसला दिली. अमरावतीची जागा काँग्रेसला दिली. आम्ही आता अपेक्षा ठेवल्या तर चुकीची आहे असं वाटत नाही. असंही संजय राऊत म्हणाले.

You Might Also Like

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

तर राजकारणात त्याचे कसे तुकडे करायचे ठरवू , उद्धव ठाकरेंचा मातोश्री वर यल्गार ?

अजित पवार दोषी असेल तर फासावर लटकवा, वैष्णवी हागवणे मृत्यूप्रकरणी अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया ; म्हणाले असले नालायक लोक मला……

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात? प्रभाग रचना प्रक्रियेला सुरुवात

आगामी महापालिका महायुती म्हणून एकत्र लढणार, पण… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितल…

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article मध्यरात्री मंत्री राधाकृष्ण विखेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट,जरांगे म्हणाले लढाईला उतरायचं म्हणजे तलवार काढावी लागेल.
Next Article ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर केडगावमध्ये चाकूने हल्ला.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?