By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: मुनगंटीवार निवडून आले तर शिलाजीत देऊ नितीन गडकरींचं विधान चर्चेत.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > राजकारण > मुनगंटीवार निवडून आले तर शिलाजीत देऊ नितीन गडकरींचं विधान चर्चेत.
राजकारण

मुनगंटीवार निवडून आले तर शिलाजीत देऊ नितीन गडकरींचं विधान चर्चेत.

TIMES OF AHMEDNAGAR | INDIA | MAHARASHTRA | LOK SABHA ELECTION | SUDHIR MUNGANTIWAR | UNION MINISTER NITIN GADKARI | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/04/07 at 4:35 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी अवघे दोन आठवडे शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचार सभांचा जोर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून स्टार प्रचारक म्हणून नितीन गडकरी प्रचासभा घेत आहेत. शनिवारी  गडकरींनी चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी घेतलेल्या प्रचारसभेत जोरदार टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी केलेल्या मिश्किल टिप्पणीमुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

Nitin Gadkari News in Marathi (नितीन गडकरी मराठी बातम्या) Latest News on Nitin  Gadkari in Marathi (नितीन गडकरी ताज्या मराठी बातम्या) at Loksatta.com

राजकारण पैशाचाच धंदा झालाय.

नितीन गडकरींनी  आपल्या भाषणात आमदारांच्या वृत्तीवर बोट ठेवलं. राजकारण म्हणजे पैशाचा धंदा झालाय, असं गडकरी म्हणाले. विकासाची कामं करायची असतील तर नेतृत्वाला दृष्टी असायला हवी. तुम्ही डोळे दान करू शकता, पण दृष्टी दान करू शकत नाही. विकासाची दृष्टी असायला हवी. पण आजकाल तर राजकारण म्हणजे पैशाचाच धंदा झालाय. मला जास्त बोलता येत नाही. पण ही माझी फार तीव्र भावना आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari : मुनगंटीवारांना पॉवरफुल शिलाजीत देऊ की काम एकदम जोरात होईल,  विकासाचं काम: गडकरी - nitin gadkari big statement on sudhir mungantiwar  chandrapur lok sabha election 2024 ...

 पेहेले माल दो, फिर काम लो.

मी १० वर्षांत ५० लाख कोटींची कामं केली आहेत. पण तुम्हाला एकही ठेकेदार असा सापडणार नाही की मला काम मिळवण्यासाठी गडकरींकडे जावं लागलं. आता कुणाच्या मतदारसंघात काम केलं तर आधी आमदार काम थांबवतात. मी म्हणतो अरे तुमच्या मतदारसंघात काम करतोय. तर ते म्हणतात वो कुछ नहीं. विकास, बिकास, भकास.. पेहेले माल दो, फिर काम लो. मी इथे बसलेल्या आमदारांबद्दल बोलत नाही. नाहीतर तुम्ही भलतीकडे डोकं लावाल. मी बाहेरच्या आमदारांबद्दल बोलतोय अशा शब्दांत गडकरींनी सध्याच्या राजकीय वातावरणावर भाष्य करताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

जो अच्छा काम करता है, उसे कभी सम्मान नहीं मिलता...', नितिन गडकरी ने ऐसा  क्यों कहा? - union minister nitin gadkari says who does good work never  gets respect ntc - AajTak

मैं जो बोलता हूँ, वही करता हूँ और जो करता हूँ, वही बोलता हूँ.

यावेळी नितीन गडकरींनी सुधीर मुनगंटीवार यांचं नाव घेऊन मिश्किल टिप्पणी केली. तुम्ही फक्त एकदा मुनगंटीवारांना निवडून द्या मग पाच वर्षांत बघा कसा करंट लागेल. ट्रिपल इंजिन लागल्यानंतर या मतदारसंघाचा विकास चार पटीने होईल असं गडकरी म्हणाले.

मी उगीच काहीतरी बोलणारा नेता नाही. कुणीही पत्रकार मला प्रश्न विचारू शकत नाहीत. मैं जो बोलता हूँ, वही करता हूँ और जो करता हूँ, वही बोलता हूँ. तुम्ही सुधीर मुनगंटीवारांना निवडून पाठवा. त्यांच्यामागे मोदींची ताकद, माझी ताकद, ट्रिपल इंजिन.. असं पॉवरफुल शिलाजीत देऊ, की बस्स. विकासाचं काम एकदम जोरात होईल असं गडकरींनी म्हणताच उपस्थितांमध्ये पुन्हा एकदा जोरदार हशा पिकला होता.

You Might Also Like

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

तर राजकारणात त्याचे कसे तुकडे करायचे ठरवू , उद्धव ठाकरेंचा मातोश्री वर यल्गार ?

अजित पवार दोषी असेल तर फासावर लटकवा, वैष्णवी हागवणे मृत्यूप्रकरणी अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया ; म्हणाले असले नालायक लोक मला……

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात? प्रभाग रचना प्रक्रियेला सुरुवात

आगामी महापालिका महायुती म्हणून एकत्र लढणार, पण… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितल…

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article सर्वोच्च न्यायालयाकडून पाणीवाटप कायद्यावर शिक्कमोर्तब, आता जायकवाडीला पाणी ‘या’ धरणांकडून मिळत राहणार.
Next Article शेतातून जाणाऱ्या रस्त्यावरून झाला वाद अन त्या वृद्धाचा झाला खून, आरोपी चालले होते पळून अन झाले असे…
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?