जर आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर आम्ही हे सरकार पाडू, आम्हाला जो फसवणार त्याचा गेम आम्ही लावू – जरांगेंचा सरकारवर निशाणा.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | CHHATRAPATI SAMBHAJI NAGAR | MARATHA RESERVATION | STATE GOVERNMENT | MANOJ JARANGE | LEGISLATIVE ASSEMBLY ELECTION | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
छत्रपती संभाजीनगर – राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्यासाठी आमचे सर्वेक्षण सुरु आहे. एकूण सहा टप्प्यात हे सर्वेक्षण होणार आहे. त्यानंतर २८८ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेऊन कोणत्या जागांवर ताकदीने निवडणूक लढवायची, हे निश्चित केले जाईल. आतापर्यंत आम्ही विधानसभेच्या १२७ जागांची चाचपणी केल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
मनोज जरांगेंचा सरकारवर निशाणा…..
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत मराठा समाज एकत्रित येऊन कशाप्रकारे निवडणूक लढवू शकतो, याबाबत ढोबळ माहिती दिली आहे. मराठा समाजाविरोधात काड्या करणाऱ्यांना आणखी दोन-चार महिन्यांनी आम्ही घरी पाठवू. ते आम्हाला खड्यात घालणार असतील तर आम्ही त्यांना १०० टक्के बुडवणार आहोत. राज्य सरकारमधील आठ ते नऊ मंत्री मराठाद्वेष्टे आहेत. ते मराठ्यांविरोधात काड्या करत असतात. दंगली झाल्या पाहिजेत, यासाठी प्रयत्न करतात. या सगळ्यांचा आम्ही विधानसभा निवडणुकीला ठरवून कार्यक्रम करु, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. राज्य सरकारने आम्हाला आरक्षण दिले नाही तर आम्ही पूर्वीसारखे रडत बसणार नाही. आधी सरकारनेच सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कायदेतज्ज्ञ आणले. आता तुम्हीच हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, अशी भाषा सुरु केली आहे. पण आता आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर आम्ही हे सरकार पाडतच असतो. आता आम्हाला जो फसवणार त्याचा गेम आम्ही लावू. एकदा आम्ही गेम केला आहे आता पुन्हा एकत्र जमून गेम करु, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
मराठा नेत्यांनीही समाजाच्या सभांना, बैठकांना आले पाहिजे-मनोज जरांगे
आतापर्यंत आम्ही राज्यातील १२३ ते १२७ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला आहे. आमचे सर्वेक्षणाचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईतील काही जागांवर चाचपणी करण्यात आली आहे. सहा टप्प्यात २८८ जागांचा आढावा घेतल्यानंतर आम्ही किती जागांवर फोक ठेवायचा, हे ठरवू. आपल्या किती जागा जिंकणार, हे आम्ही ठासून सांगू. आमचा एक्झिट पोलच वेगळा असणार आहे. वेळ पडली तर आम्ही सगळे चर्चा करुन २८८ जागांवर मराठा समाजाचे उमेदवार उभे करायचे की २८८ जागांवर उमेदवार पाडायचे हे ठरवू. असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी मराठा समाजाच्या नेत्यांनाही इशारा दिला आहे. विरोधी लोक बोंबलत आहेत, मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही. त्यांचा नेता बोंबलत आहे. मराठ्यांनी मते देऊनही ते तुमच्या छाताडावर पाय देत आहेत. तुम्ही मतदान करुनही त्यांना जातीचा इतका स्वाभिमान असेल तर मग तुम्हाला का नसावा ? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी मराठा नेत्यांना विचारला आहे. त्यांचे नेते त्यांच्या समाजाच्या आंदोलनात जात असतील तर आता मराठा नेत्यांनीही समाजाच्या सभांना, बैठकांना आले पाहिजे. आम्हीही आमच्या जातीच्या मोर्चात जाऊ, असे मराठा नेत्यांनी सांगितले पाहिजे. अन्यथा या नेत्यांनाही निवडणुकीत मराठा समाज पाडेल, असे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.