सिनेसृष्टीतील कास्टिंग काऊचबाबत अनेकांना वेगवेगळा अनुभव येतो,काही कलाकार न सांगता सिनेसृष्टी सोडून देतात तर काही हिम्मत करून अनुभव सांगत असतात. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी न घाबरता समोर येऊन उघडपणे बेधडक वक्तव्य केली आहेत. मल्लिका शेरावतपासून अगदी अंकिता लोखंडेपर्यंत अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काऊचसारख्या अत्यंत घाणेरड्या अनुभवांचा सामना करावा लागला असल्याचे त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. तसेच, कामाच्या बदल्यात अभिनेत्रींकडे अत्यंत घृणास्पद मागण्या करण्यात आल्याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. आता एक नवीनच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीची रूमर्ड गर्लफ्रेंड असलेली अभिनेत्रीही कास्टिंग काऊचपासून वाचू शकलेली नाही. दिग्दर्शक रोहित शेट्टीची ‘रूमर्ड गर्लफ्रेंड’ म्हणजे प्राची देसाई जिनं २००८ मध्ये ‘रॉक ऑन’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.प्राचीन एकदा तिच्यासोबत घडलेल्या कास्टिंग काऊच घटनेबद्दल स्पष्ट वक्तव्य केलेय. तसेच, इंडस्ट्रीत आल्यानंतर एका दिग्दर्शकानं तिच्याकडे केलेल्या अत्यंत घृणास्पद मागणीचा खुलासाही तिने केला आहे. दरम्यान, दिग्दर्शकाच्या मागणीनंतर प्राची देसाईनं तो चित्रपट नाकारला.
(संग्रहित दृश्य.)
प्राची पेक्षा रोहित शेट्टी १५ वर्षांनी मोठा….
बॉलिवूड बबलला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत बोलताना प्राची देसाईनं सांगितलं की, तिला एका मोठ्या चित्रपटाची ऑफर आली होती, पण त्यासाठी तिला कॉम्प्रोमाइज करावं लागणार होतं. तिनं सांगितलं की, मोठ्या चित्रपटात काम करण्यासाठी मला थेट कॉम्प्रोमाइज करण्याची ऑफर देण्यात आलेली. पण मी स्पष्ट नकार दिला. त्या दिग्दर्शकानं फोन केल्यानंतर मी म्हटलं की, मला तुमच्या फिल्ममध्ये अजिबातच रस नाही. चित्रपटासाठी तडजोड करण्यास सांगण्यात आले होते. एका खास चित्रपटात, मोठ्या चित्रपटात काम करण्यासाठी थेट ऑफर देण्यात आल्या होत्या, पण मी स्पष्टपणे नकार दिला. ‘त्या दिग्दर्शकानं मला फोन केल्यानंतर, मी नकार दिला, मी सांगितलं की, मला तुमच्या चित्रपटात रस नाही. कधीकाळी प्राची देसाईचं नाव तिच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठा असलेल्या दिग्दर्शक रोहित शेट्टीशी जोडलं गेलेलं. ‘बोल बच्चन’च्या शूटिंगदरम्यान रोहित आणि प्राची यांचं सूत जुळलं, असं सांगितलं जातं. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. रोहित शेट्टीच्या या एक्स्ट्रा मॅरेटियल ऑफरमुळे त्याची पत्नी माया रोहितला सोडणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला होता. त्यानंतर मात्र, रोहितनं प्राचीची साथ सोडून त्याच्या पत्नीची समजूत काढली आणि आपला संसार वाचवला, असंही सांगितलं जातं. त्यानंतर मात्र, प्राची आणि रोहित यांच्यातील दुरावा वाढला, असंही सांगितलं जातं.