अहमदनगरमध्ये धक्कादायक प्रकार, एका अल्पवयीन मुलीवर मित्रानेच लॉजवर नेवून केला बळजबरीने लैंगिक अत्त्याचार….
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | MIDC POLICE STATION | THE INCIDENT OF RAPE OF A MINOR GIRL BY LURING HER INTO MARRIAGE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
नगर तालुक्यातील इमामपूर शिवारात फिरायला जाण्याचा बहाणा करत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. आदिनाथ लोंढे (हल्ली रा. भराट गल्ली, भैरवनाथ मंदिराशेजारी, खासगी होस्टेलमध्ये, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
लग्न करण्याचे आमिष दाखवून बळजबरीने तिच्यावर अत्याचार…
अधिक माहिती अशी कि फिर्यादी अल्पवयीन मुलगी नगरमध्ये राहत आहे. व अकरावीमध्ये शिक्षण घेत आहे. तिची आदिनाथ सोबत ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले होते. मात्र ही मैत्री अल्पवयीन मुलीस महागात पडली आहे. आदिनाथने मैत्रीचा फायदा घेत तिला दुचाकीवरून बुधवारी (दि. २९) दुपारी साडेबाराच्या सुमारास इमामपूर (ता. नगर) शिवारातील एका लॉजवर नेले होते. लग्न करण्याचे आमिष दाखवून बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला आहे. घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. दरम्यान सदरचा प्रकार फिर्यादी अल्पवयीन मुलीने नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी रात्री एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली आहे. पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून आदिनाथ लोंढे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.