TIMES OF AHMEDNAGAR
भाग – ४
अहमदनगर शहरासह जिल्ह्यात गुंडांची दहशत असल्याच्या प्रकारांना जोर येत आहे. वारंवार खुनाचे प्रकार घडणे,अवैध धंद्यामुळे मारामाऱ्या होणे अशे विचित्र प्रकार सर्वसामान्य जनतेचे डोकेदुखी वाढवत आहेत. मात्र हे प्रकार थांबवण्यास प्रशासन असक्षम असल्याचे आरोप राजकीय नेत्यांमधून करण्यात येत असतात.पोलीस देखील सर्वसामान्य नागरिकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप एका तरुणाने केला आहे. रवींद्र कर्डिले यांच्यावर स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असतांना लाच मागितल्याचा गुन्हा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.मात्र आज कर्डिले हे पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेचे कारभारी आहेत .आणि फिर्यादीवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र रचत आहेत. कर्डिले स्थानिक गुन्हे शाखेत हजर झाल्यापासून माझ्यावर तीन वेळा कलम ३०७ सारखे खोटे गुन्हे दाखल झाले आहेत असे त्यांनी सांगितले आहे. आता मात्र गृहमंत्रालय व पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करेल याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष वेधले आहे.
कर्डिले यांना दिनांक – ०९/०५/२०२३ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय,अहमदनगर (अस्थापना शाखा) आशा/१०७/४.१/सलग्न नेमणूक/६७११ /२०२३ चे पत्र देऊन तात्पुरत्या स्वरुपात सलग्न नेमणूक दिली होती.मात्र आज जवळपास वर्षभर कर्डिले हे स्थानिक गुन्हे शाखा / सायबर पो.स्टे येथेच कार्यरत आहेत.शिर्डी येथे नेमणूक असलेले कर्डिले यांच्यावर प्रशासन एवढे मेहेरबान का आहे असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
कायद्याने दिली सेवा करण्याची ताकीत , गरिबांना फसवण्याची ताकत त्याच्या खाकीत ?
अहमदनगर शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी हि वाढत आहेच गुन्हागारांना पोलीस जेरबंद करतात. मात्र पोलिसांनी लाच मागितल्याची तक्रार जर एखाद्या सर्वसामान्य नागरिकाने केली तर त्याची खैर नाही असे चित्र सध्या समोर येत आहे. अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचारी रवींद्र कर्डिले यांच्यावर २०२० मध्ये असद गफ्फार शेख यांच्याकडून लाच मागणीसंदर्भात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असतांना रवींद्र कर्डिले यांनी ३ ऑगस्ट २०२० रोजी शेख यांच्याकडून रुपये वीस हजार एवढी लाचेची मागणी केली होती. त्यासंदर्भात शेख यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्याकडे तक्रार केली होती. अत्यंत गंभीर घटना असल्याचे मत व्यक्त करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पूर्ण तपासणी करून रवींद्र कर्डिले यांना १४ ऑगस्ट रोजी अटक केले होते. कोर्टाने कर्डिले यांना २ दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. कोर्जाटाने जामीन मंजूर केल्यांनतर कर्डिले यांची सुटका झाली. त्यानंतर दोन वर्ष निलंबित असणारे कर्डिले यांना शिर्डी येथे हजर करून घेण्यात आले होते.