TIMES OF AHMEDNAGAR
आठ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नराधम आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पवन पांडे असे आरोपीचे नाव आहे. पवन पांडे याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी रात्री हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले होते. पुण्याच्या पाषाण परिसरात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या करण्यात आली.
स्त्रोत.सोशल मिडिया.
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार अन गळा दाबून हत्या …..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आठ वर्षीय अल्पवयीन मुलगा आणि पवन पांडेची तीन दिवसांपूर्वी ओळख झाली होती. पांडे हा रसवंती गृहात काम करायचा नुकतेच तीन दिवसांपासून त्याने काम सुरू केलं होतं. रसवंती समोर काही मुलं खेळायला यायचे. यात आठ वर्षीय हत्या झालेल्या मुलाचा देखील समावेश आहे. पांडेने त्याच्याशी ओळख केली मग जवळीक साधली. रसवंतीगृह असल्याने अल्पवयीन मुलांना रस प्यायला द्यायचा. मुलगा आणि आरोपी यांच्यात ओळख वाढली. याचा फायदा घेऊन आरोपी पांडेने शनिवारी रात्री आठ च्या सुमारास अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याला पाषाण येथील परिसरात नेले. तिथं त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले मग त्याचा गळा दाबून हत्या केली.
स्त्रोत.सोशल मिडिया.
पोलिसांनी पांडेला बेड्या ठोकल्या
मुलगा घरी आला नसल्याने त्याच्या पालकाने त्याचा शोध घेतला. मात्र, मुलगा सापडत नसल्याने त्यांनी पहाटेच्या सुमारास वाकड पोलीस ठाणे गाठून मुलगा हरवल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. तपासात आठ वर्षीय मुलाची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. रसवंतीत कामाला असलेल्या पांडेची चौकशी करण्यात आली. पोलिसांचा त्याच्यावर संशय होता. परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. यात पांडे आणि अल्पवयीन मुलगा जात असल्याच आढळलं. अखेर या सर्व प्रकरणाचे बिंग फुटले आणि वाकड पोलिसांनी पांडेला बेड्या ठोकल्या आहेत.