TIMES OF AHMEDNAGAR
अहमदनगर शहराचे वातावरण दिवसेंदिवस गढूळ होत चालले आहे. भरदिवसा अवैध धंद्यांचा सूळसुळाट तर मध्यरात्री खुनी हल्ले,शहरात घडणे नवीन नाही. यावर पोलीस दलाचे नियंत्रण नाही. शहरात अनेक घटना या अवैध धंद्यांच्या वर्चस्वाच्या लढाईमुळे होत आहेत. अवैध धंद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या भिंगार शहरात देखील एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. मात्र काही वसुली बहाद्दरांमुळे या प्रकरणावर पडदा पडला होता. मात्र प्रशासनाच्या चुप्पीने जनतेच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे.



