त्याने तिच्या डोक्याचे केस पकडून खोलीत नेले ; दुसऱ्याने चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने शारीरीक संभोग करत…..
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | NALASUPRA | CRIME NEWS | VIOLENCE AGAINST WOMEN | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
नालासोपारा : नालासोपाऱ्यात एका ३२ वर्षीय महिलेवर चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात दोन नराधमांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, दोन्ही आरोपी आता फरार आहेत. ३२ वर्षीय पीडित महिला ही १० सप्टेंबरला रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास मुलाला घराच्या बाजूला बोलविण्यासाठी गेली होती. तेव्हा तेथील एका आरोपीने तिच्या पाठीमागून येऊन महिलेच्या डोक्याचे केस पकडून एका हाताने तोंड दाबले. त्यानंतर एका गल्लीतून खेचत नेऊन एकाच्या रुममध्ये घेऊन जावून दुसऱ्या आरोपीने पीडित महिलेला चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने शारीरीक संभोग केल्याची पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.सदर प्रकार जर कोणास सांगितला, तर जीवे ठार मारण्याची धमकी दोन्ही आरोपींनी तिला दिली. शेवटी शनिवारी पीडित महिलेने तुळींज पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपी विरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला असल्याची माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिली.
(संग्रहित दृश्य.)
महिलेला खेचत एका खोलीत नेले.
१० सप्टेंबर रोजी पीडित महिला रात्री सव्वा नऊच्या दरम्यान घराच्या बाजूला मुलाला बोलावण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने महिलेच्या पाठीमागून येऊन डोक्याचे केस पकडून तिचे तोंड दाबले. यानंतर महिलेला खेचत एका खोलीत नेले. तर दुसऱ्या आरोपीने पीडित महिलेला चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादी महिलेने सांगितले आहे. सदर घटनेनंतर पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून सध्या हे दोघेही फरार असल्याची माहिती समोर आली आहे.
(संग्रहित दृश्य.)
अनघा ढवळेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
मित्राच्या पत्नीला परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेवणाचा आग्रह करणाऱ्या आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पुण्यातील महिला पोलिसाचे निलंबन करण्यात आले आहे. पुण्यातील वाहतूक पोलीस विभागात ही महिला पोलीस कार्यरत होती. अनघा ढवळ असं या आरोपी महिला पोलिसाचे नाव आहे. इन्स्टा स्टार म्हणूनही तिची ओळख होती. पीडित महिलेने याबाबत कोल्हापुरातील गडहिंग्लज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर अनघा ढवळेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आरोपी अनघा सुनील ढवळे हिची कोथरुडच्या वाहतूक पोलीस विभागात नेमणूक होती. अनघा ढवळे हिने तिच्या मित्राच्या पत्नीला तू परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेव, अन्यथा तुझ्या घरातील लोकांना ठार मारु, अशी धमकी दिली होती.महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर ढवळेचे निलंबन करण्यात आले आहे.