पुणे : शाळकरी मुलीला दारु पाजून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या मित्रांसह एका मैत्रीणीविरुद्ध पोलिसांनी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्यात आलेले अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

In 95% of rape cases, the family also backs away in the fight for justice. | जब अपने तोड़ दें सपने: 'शादी नहीं होगी' बोलकर फैमिली करा देती है चुप, दुष्कर्म के(संग्रहित दृश्य.)

मुलीच्या मैत्रिणीने फूस लावून हा प्रकार …..

पीडित मुलगी आणि एका मुलाची ओळख होती. त्याने मुलीला आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मुलीच्या मैत्रिणीने मुलीला फूस लावून एका मित्राच्या घरी नेले. तेथे तिला दारु पाजली. दारुच्या नशेत मुलीच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला असल्याचे तिने सांगितले आहे. मित्रासोबत असलेल्या एकाने मोबाइलवर छायाचित्रे काढल्याचे पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गोरड तपास करत आहेत.

Chhattisgarh Rape like Nirbhaya Case accused murder woman arrested in janjgiri Champa ann | खौफनाक! छत्तीसगढ़ में महिला के साथ निर्भया जैसी दरिंदगी, रेप के बाद सीने और गले की ...(संग्रहित दृश्य.)

अवि पोपळघटने बलात्कार केल्याची तक्रार.

वारजे भागात एका मुलीवर विवाहाचे आमिष दाखून बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अवि कालीदास पोपळघट (वय २०, रा. संघर्ष चौक, वारजे माळवाडी) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत एका मुलीने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुलीची आणि आरोपी पोपळघटची ओळख होती. पोपळघटने मुलीला विवाहाचे आमिष दाखविले. त्यानंतर त्याने मुलीवर बलात्कार केला. मुलगी गर्भवती झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती समजली. तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे तपास करत आहेत.