TIMES OF AHMEDNAGAR
श्रीरामपूर : श्रीरामपूर येथील समाजवादी पार्टीच्या जिल्हा कार्यालयात नुकतीच जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांच्या अध्यक्षतेखाली समाजवादी कार्यकर्ता -पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली, यामध्ये जिल्ह्यातील विधानसभेत समाजवादी पार्टीचे उमेदवार रिंगणात उतरविण्याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी समाजवादी पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्या देशातील आणि राज्यातील राजकीय वातावरण पाहता कोणता नेता कोणत्या पक्षात जाईल याचे सांगता येणे मोठे दुरापास्त झाले आहे. सकाळी एका पक्षात असणारा नेता सायंकाळी दुस-या पक्षात प्रवेश करत आहे, सकाळी जो विरोधकांच्या विषयी विरोधात बोलत होता, सायंकाळी तोच विरोधकांच्या समुहात सामील होत मांडीला मांडी लावून त्यांचे गुणगाण गात आहे, हे सर्व पाहून मतदार राजामध्ये प्रचंड प्रमाणात संताप आणि चीड यासोबतच संभ्रमणाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून सर्व जाती धर्माला बरोबर घेवून चालणारा आणी सर्वांना समान न्याय देणारा असा उमेदवार, असा पक्ष समस्त जागरुक मतदारांना हवा आहे, आणी तो पक्ष केवळ समाजवादी पार्टी हा पक्ष असल्याने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेशजी यादव, प्रदेशाध्यक्ष अबु असिम आझमी यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात समाजवादी पार्टी आपले उमेदवार उभे करणार असल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


