Reading:जामिनावर सुटलेल्या अल्पवयीन आरोपींनी दारू प्यायला पैसे न दिल्याने केली एका ज्येष्ठ नागरिकाची हत्त्या-पुण्यातील हायक्लास परिसरातील धक्कादायक प्रकार….
जामिनावर सुटलेल्या अल्पवयीन आरोपींनी दारू प्यायला पैसे न दिल्याने केली एका ज्येष्ठ नागरिकाची हत्त्या-पुण्यातील हायक्लास परिसरातील धक्कादायक प्रकार….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | PUNE | INVERTED | CRIME NEWS | A SENIOR CITIZEN WHO REFUSED TO PAY FOR LIQUOR WAS BEATEN TO DEATH BY A ROD | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
पुणे- गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्हा हा गुन्हेगारी घटनांमुळे चांगलाच चर्चेत आहे. कल्याणीनगरच्या पोर्श अपघाप्रकरणानंतर पुण्यातील गुन्हेगारीचा मुद्दा आणखीनच ऐरणीवर आला आहे. या सगळ्यामुळे पोलीस दलाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अशातच आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील उच्चभ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या औंध परिसरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला दारुच्या नशेत असणाऱ्या टोळक्याने मारहाण केली आहे. यामध्ये वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. समीर रॉय चौधरी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे पुण्यात चाललेय काय ? पुणे पोलीसांचा गुन्हेगारांना धाक उरलाय का असा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. दारुसाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या जेष्ठ नागरिकाचा पुण्यातील परिहार चौकासारख्या उच्चभ्रू परिसरात डोक्यात रॉड मारुन हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
डोक्यात रॉड मारून हत्त्या….
समीर रॉय चौधरी असे हत्या झालेल्या ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरीकाचे नाव असून ते टाटा कंपनीतुन सेवानिवृत्त झाल्यावर पुण्यातील औंध भागात स्थायिक झाले होते. गुरुवारी पहाटे सव्वा पाच वाजता ते मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले आणि परिहार चौकालगत असलेल्या फुटपाथवरून ते निघाले होते. त्यावेळी रात्रभर दारु पार्टी केलेले चार जणांचे टोळके बाहेर पडले होते. या टोळक्याला आणखी दारू हवी होती आणि त्यासाठी पैसे हवे होते.
स्त्रोत सोशल मिडिया
दारूसाठी टोळक्याचे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या व्यक्तींवर हल्ले….
दारूसाठी अजून पैशांची व्यवस्था करण्यासाठी या टोळक्याने मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या व्यक्तींवर हल्ले सुरु केले होते. दोन व्यक्तींवर हल्ला केल्यावर या टोळक्याने समीर रॉय चौधरी यांना गाठले. टोळक्याने त्यांच्याकडे दारुसाठी पैशांची मागणी केली होती. मात्र त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे वैतागलेल्या टोळक्याने समीर रॉय चौधरी यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला आहे. यामध्ये समीर रॉय चौधरी गंभीर जखमी झाले आहेत आणि उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली असून विशेष म्हणजे त्यातील तीन आरोपी हे अल्पवयीन आहेत. त्यापैकी दोन अल्पवयीन आरोपींवर आधीच हत्येचा गुन्हा दाखल असुन मागील आठवड्यातच ज्युवेनाईल कोर्टाने त्यांची बाल निरीक्षण गृहातून जामीनावर सुटका केली होती. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हातून घडणाऱ्या गुन्ह्यांना रोखण्याचे कायदेशीर आव्हान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.