अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफच्या नात्याबद्दल एक था टाइगर चित्रपटाचे निर्माते कबीर खान यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले…..
TIMES OF AHMEDNAGAR | MUMBAI | BOLLYWOOD | ACTOR SALMAN KHAN | ACTRESS KATRINA KAIF | PRODUCER KABIR KHAN | ACTOR VICKY KAUSHAL | KABIR KHAN MADE A BIG REVELATION ABOUT SALMAN KHAN AND KATRINA'S RELATIONSHIP | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
बॉलीवूड अभिनेता सलमान खान व अभिनेत्री कतरिना कैफ हे दोघे नेहमीच चर्चेत असतात. एक काळ असा होता जेव्हा दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. सगळीकडे त्यांच्याच नात्याची चर्चा सुरू होती. मात्र हे नाते जास्त काळ टिकले नाही काही वर्षातच दोघे वेगळे झाले होते. ब्रेकअपनंतरही त्यांच्या नात्याची अनेकदा चर्चा रंगताना दिसते. ब्रेकअपनंतर दोघे पहिल्यांदाच एक था टायगर या चित्रपटात एकत्र झळकले होते. एका मुलाखतीत एक था टायगर चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी सलमान व कतरिना बाबतचा एक किस्सा सांगितला आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
कतरिना आणि सलमानला एकत्र कास्ट करण्यामागचा खुलासा काय …..
अलीकडेच कबीर खानने कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्या मॅशेबल इंडिया या नवीन पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी एक था टायगर या चित्रपटामध्ये मध्ये कतरिना आणि सलमानला एकत्र कास्ट करण्यामागचा खुलासा केला. कबीर म्हणाला एक था टायगर चित्रपटासाठी आम्ही कतरिनाला आधीच साइन केले होते. चित्रपटात तिची जोयाची व्यक्तिरेखा होती आणि मग आम्ही सलमान खानकडे गेलो. याच काळात त्यांचे ब्रेकअप झाले होते. असे असूनही या दोघांनी चित्रपटात उत्तम काम केले आहे.पण त्यावेळी दोघे एकमेकांबरोबर काम करताना अवघडल्यासारखे वाटत होते.मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान आणि कतरिनाने २००५ मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. मात्र पाच वर्षातच त्यांचे नाते तुटले. २०१० मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर कतरिनाने रणबीर कपूरला डेट करायला सुरुवात केली. मात्र कतरिनाचे रणबीर कपूरसोबतही ब्रेकअप झाले होते. यानंतर कतरिनाने २०२२ मध्ये अभिनेता विकी कौशलबरोबर लग्नगाठ बांधली आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २८६ कोटी रुपयांची कमाई……
सलमान खान आणि कतरिना कैफच्या कामगिरीबद्दल बोलायचे ठरल्यास दोघांनेही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांनी मैने प्यार क्यूं किया,पार्टनर,हॅलो,युवराज, एक था टायगर,टायगर जिंदा है, भारतमध्ये एकत्र काम केले आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये दोघांचा टायगर ३ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २८६ कोटी रुपयांची कमाई केली होती.