TIMES OF NAGAR
अ.नगर : नगरकरांनी सलग पंचवीस वर्ष शिवसेनेला निवडून दिल आहे. दोन वेळा शिवसेनेचा अत्यंत कमी फरकाने पराभव झाला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात शहराची जागा जरी शिवसेनेला सुटली नसली तरी देखील महाविकास आघाडीला मिळालेली मते ही शिवसेनेचीच आहेत. अहिल्यानगरकरांच्या मनात आजही हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, हिंदू धर्मरक्षक स्व. अनिलभैय्या राठोड यांची शिवसेनाच आहे, असे प्रतिपादन ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांनी केले आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने विभागवार बैठकांचे सत्र सुरू केले आहे. या अंतर्गत सावेडी उपनगर विभागातील प्रमुख शिवसैनिकांची पहिली बैठक पार पडली. यावेळी किरण काळे बोलत होते. यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. अंबादास शिंदे, ज्येष्ठ शिवसैनिक रावजी नांगरे, कामगार सेनेचे विलास उबाळे, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रशांत भाले, सावेडी उपनगर उपशहर प्रमुख प्रशांत पाटील, कामगार सेना शहर प्रमुख गौरव ढोणे, अहिल्यानगर विधानसभा युवासेना युवा अधिकारी आनंद राठोड, केशव दरेकर, सुजय लांडे, ऋतुराज आमले, विजय सानप, तुषार लांडे, सुनील भोसले, अण्णा कोडम, किशोर कोतकर, शंकर आव्हाड, आकाश अल्हाट, आनंद जवंजाळ, विकास भिंगारदिवे, गणेश आपरे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


