कमल्या आणि संभ्या कोणाचे पंटर , कधी चालणार या पंटरवर गितेंचा हंटर ?
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MAHARASHTRA POLICE | AHMEDNAGAR | DISTRICT SUPERINTENDENT OF POLICE | TALUKA POLICE STATION | INSPECTOR OF POLICE | ILLEGAL BUSINESSES | THE ABOVE NEWS / INFORMATION IS BEING PUBLISHED AS PER THE INFORMATION GIVEN BY THE SOURCES. THE EDITOR HAS NO INTEREST OR CONNECTION WITH IT. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव लांडगा येथे दोन मुलींसह आईचा मृत झाला आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून ही घटना झाल्याचे सांगण्यात आले. आरोपी सुनील लांडगे याला पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यातून त्यांचे नेहमीच वाद होत होते. काल सकाळी (२५ मार्च) सुनील लांडगे व त्याच्या पत्नीत पुन्हा वाद झाला. त्याने पत्नीसह मुलींच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. या भीषण आगीत तिघींचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे
स्त्रोत.सोशल मिडिया.
आरोपी दारूच्या नशेत !
पिंपळगाव लांडगा येथे पत्नी व मुलींना सुनील लांडगे याने जिवंत जाळले होते. पत्नीला व पोटाच्या मुलींना जिवंत जाळण्याचे कृत्य करतांना सुनील याने अवैध दारूचे सेवेन केले होते. सुनीलने नशेत मग्न होऊन हे कृत्य केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जर अवैध धंदे व अवैध दारू विक्री तालुका हद्दीत बंद असती तर कदाचित सुनील नशेत मग्न झाला नसता आणि हे कृत्य कदाचित घडले नसते अशी खंत नागरिक व्यक्त करत आहेत.
तालुका हद्दीत अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ अहमदनगरने वारंवार प्रकाशित करून तालुका हद्दीतील अवैध धंद्यांचा वाचा फोडला होता. टाईम्स ऑफ अहमदनगरने अवैध धंद्यांच्या साम्राज्याचा पोलखोल केल्यानंतर तालुका पोलिसांनी अवैध धंद्यांच्या काही मोजक्या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. मात्र या कारवाईने सर्वसाधारण नागरिक संतुष्ट नसल्याचे बोलले जात आहे. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गिते यांच्या यंत्रणेने दिखाव्यापुरती कारवाई केली असल्याची चर्चा सध्या दबक्या आवाजात सूरु आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
अवैध धंद्यांची मलई खाणाऱ्यांना गिते आवळणार का ?
तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक मोठ्या अवैध धंद्यांचे साम्राज्य आहे. बेकायदेशीर दारू विक्री वेश्याव्यवसाय अशा अनेक बड्या अवैध धंदे चालकांनी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीला घेरले आहे. अवैध धंद्यांमुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीला मोठी चालना मिळत आहे. या गुन्हेगारांना संभ्या व कमल्या नामक इसम सहकार्य करत आहे. अवैध धंदे चालकांकडून बड्या अधिकाऱ्यांशी आपले संबंध असल्याचे भासून संभ्या व कमल्या अवैध धंद्याची मलाई खात आहेत. मात्र संभ्या आणि कमल्या या दोन बहाद्दुरांच्या मुसक्या आवळण्यात गिते अयशस्वी असल्याचे चित्र असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
स्त्रोत.सोशल मिडीया.
कमल्याला व्हायचंय मोठा अधिकारी अन संभ्याला व्हायचंय अधिकाऱ्यांचे पंटर ?
कोणतेही काम करत असतांना त्या कामामध्ये प्रत्येक माणसाचे स्वार्थ असतेच. तसेच स्वार्थ जर कमल्या आणि संभ्याचे असले तर त्यात गैर काय असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. तालुका हद्दीतील अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या दोन बहादुररांचे मोठे स्वार्थ आहे. आपण ज्या लोकांसाठी मलई जमा करत आहोत हीच मलई जर आपण त्या पदापर्यंत जाऊन जमा केली तर मोठा फायदा होईल या संकल्पनेतून कमल्या नामक पंटरला मोठा अधिकारी व्यायचं आहे. तर आईय्याशखोर संभ्या नामक पंटर हा कामचोर आहे. आपल्या कडून झालेल्या चुक्यांना व गैर कारभाराला साहेबांनी पदरात पाडून घ्यावे आपल्यावर होणाऱ्या कारवाईला साहेबांनी टाळावे यासाठी संभ्या मलाई जमा करून साहेबांचे आर्थिक लाड पुरवत आहे अशी चर्चा सध्या नागरिक खासगीत करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.