संभ्या आणि कमल्याची आर्थिक वारी , त्यांच्या लालचेमुळे तालुका हद्दीत वाढतीये गुन्हेगारी ?
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | DISTRICT SUPERINTENDENT OF POLICE OFFICE, AHMEDNAGAR TALUKA POLICE STATION | CRIMINAL | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी आवळण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद गीतेंची ताकद कमी पडत असल्याचे चित्र आहे. त्याला कारण म्हणजे वाढती गुन्हेगारी आणि वाढते अवैध धंद्यांचे साम्राज्य.गीतेंनी काही महिन्यांपूर्वी सूत्रे हाती घेतली आहेत. गीतेंच्या तालुका हद्दीत वारंवार मारामारी,अवैध धंद्यांचा सुळसुळाट , परप्रांतीय महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेण्याचे काम काही बहाद्दूर करत आहेत.मात्र या टवाळखोरांवर कारवाई करण्यासाठी गीतेंच्या हालचाली का मंदावल्या आहेत हा मात्र संसोधनाचा विषय आहे. गीतेंनी गुन्हेगारांवर कारवाई करावी मात्र गुन्हेगारांपुर्वी गुन्हेगारांना आर्थिक फायद्यासाठी मदत करणाऱ्या संभ्या आणि कमल्या यांच्यावर अगोदर कारवाई करावी अशी अपेक्षा सध्या सर्वसाधारण व्यक्ती व्यक्त करत आहेत.
स्त्रोत.सोशल मिडिया.
साहेबांची मज्जा , कमल्या व संभ्यावर आर्थिक बोज्जा ?
तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोरात सुरु आहेत. मात्र संबंधित जबाबदार अधिकारी यांना कोणत्याही घटनेची गंभीरता नाही. मात्र वरिष्ठांना देखील गंभीरता नसल्याचे एकंदरित चित्र स्पष्ट आहे. कारण तालुका हद्दीत संभ्या आणि कमल्या नामक दोन इसम मोठा आर्थिक झोलझाल करत आहेत. लाखोंची लक्ष्मी अधिकाऱ्यांच्या नावावर हे बहाद्दूर जमा करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अधिकाऱ्यांच्या नावावर एवढा मोठा गैरकारभार सुरु असून देखील अधिकाऱ्यांना माहित नसेल तर नवलच. मात्र वरिष्ठांना जर गुप्त माहितीदाराकडून जर हि माहिती उपलब्ध होत नसेल तर यावर शंकाच व्यक्त होऊ शकते.
स्त्रोत.सोशल मिडिया.
तालुका हद्दीत गुंडाराज ?
एका हॉटेल चालकाशी २ दिवसांपूर्वी झालेल्या वादाच्या रागातून तरुणांच्या जमावाने हॉटेलची तोडफोड, जाळपोळ करत चालकासह तेथील २ कामगारांना लाकडी दांडके, लोखंडी रॉड ने बेदम मारहाण करत एकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील अकोळनेर – सारोळा कासार रस्त्यावर असलेल्या हॉटेल निवांत येथे सोमवारी (दि.२५) रात्री घडली.याबाबत हॉटेलचालक राजु मुक्ताजी सुंबे (रा. सोनेवाडी, ता.नगर) यांनी शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सुंबे यांचे अकोळनेर – सारोळा कासार रस्त्यावर दोन्ही गावांच्या शिवेलगत हॉटेल निवांत नावाचे हॉटेल आहे. या ठिकाणी रविवारी (दि.२४) मध्यरात्री काही तरुणाचे हॉटेल मधील कामगार व फिर्यादी सुंबे यांच्याशी वाद झाले होते.
याचा राग मनात धरून सारोळा कासार गावातील गणेश तुकाराम कडूस, शरद रमेश भोसले, वैभव राजु धामणे, शुभम गुलाब धामणे, राहुल बापू कडूस, शुभम गोरख पुंड, सलीम राजु शेख, राहुल गोरख पुंड, शुभम दत्तात्रय कडूस, आकाश बापू कडूस, विशाल रावसाहेब धामणे, लखन तुकाराम काळे, वैभव दिलीप कडूस, शुभम दत्तात्रय कडूस (सर्व रा. सारोळा कासार, ता.नगर) यांनी सोमवारी (दि.२५) रात्री हॉटेलवर जावून लाठ्या, काठ्या, लोखंडी गजाने हॉटेल मधील टेबल खुर्च्या यांची तोडफोड केली. हॉटेलच्या बाहेर केलेल्या छोट्या छोट्या कोप्यांना आग लावून पेटवून दिले. तसेच हॉटेल चालक राजु सुंबे, व्यवस्थापक आप्पा किसन पळसकर, आचारी राहुल भिकाजी पाटील यांना काठ्या व लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. तर एकाने आचारी राहुल पाटील याला जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात बिअरची बाटली फोडली असल्याचे सुंबे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे.
या फिर्यादी वरून वरील १४ जणांच्या विरोधात भा.दं.वि.कलम ३०७, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ४२७, १४३, १४७, १४८, १४९, महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत, तसेच यात आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.