बॉलीवूडच्या किंग खानला प्रत्येक आयपीएलमध्ये एकूण २५० से २७० कोटींची कमाई होते…….
TIMES OF AHMEDNAGAR | SHAH RUKH KHAN | IPL CRICKET TOURNAMENT | SHAH RUKH INCOME | SUHANA KHAN | GAURI KHAN | ABRAHAM KHAN | ARYAN KHAN | KOLKATA KNIGHT RIDERS | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
आयपीएलचं १७ वं पर्व मोठ्या धामधुमीत पार पडलं. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन तगड्या संघामध्ये या पर्वाचा अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारून ट्रॉफीवर पुन्हा एकदा आपलं नाव कोरल आहे. गेल्या दहा वर्षांपासून कोलकाता नाईट रायडर्स ही टीम जेतेपदाची वाट पाहात होती. शेवटी आता केकेआरने आपयीलची ट्रॉफी खिशात घातली आहे. दमरम्यान या विजयानंतर केकेआरचा सहमालक असलेल्या अभिनेता शाहरुख खानला नेमका काय फायदा होणार ? त्याला काय आणि संघाला काय मिळणार असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.
(फोटो सौजन्य-टाईम्स ऑफ अहमदनगर नेटवर्क)
विजयी होताच शाहरुखने भावूक होत आपल्या मुलांना मिठीत घेत.
अभिनेता शाहरुख खान हा कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा सहमालक आहे. त्याची या संघामध्ये ५५ टक्के मालकी आहे. कोलकाता नाईट रायडर्स या संघाचे अनेक सामने पाहण्यासाठी तो आपल्या कुटंबासह मैदानात हजर असतो. यावेळीदेखील तो आपली मुलं व बायकोसह अंतिम सामना पाहायला आला होता. केकेआरने सामना जिंकल्यानंतर शाहरुखचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. विजयी होताच शाहरुखने भावूक होत आपल्या मुलांना मिठीत घेत आनंद साजरा केला. तसेच या विजयानंतर त्याने मैदानात उतरून आपल्या चाहत्यांसोबतही हा आनंद साजरा केला.
(फोटो सौजन्य-टाईम्स ऑफ अहमदनगर नेटवर्क)
शाहरुखच्या केकेआरलाही हि पैसे….
खरं म्हणजे अभिनेता असल्यामुळे शाहरुख चित्रपटांच्या माध्यमातून भरपूर पैसे कमवतो. त्याचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊसदेखील आहे. यासह तो वेगवेगळ्या ब्रँड्सच्या जाहिरातींमधूनही भरपूर पैसे कमवतो. शाहरुखच्या कमाईचे हे वेगवेगळे मार्ग आहेत. यासह दरवर्षी आयपीएलच्या हंगामातही तो चांगले पैसे कमवतो. केकेआर हा संघ त्याच्या मालकीचा असल्यामुळे त्याला क्रिकेटच्या माध्यमातून पैसे मिळतात. प्रसारण आणि स्पॉन्सरशीपच्या माध्यमातून बीसीसीआयला काही पैसे मिळतात. या पैशातील काही हिस्सा आयपीएलच्या सर्व टीमला मिळतो. शाहरुखच्या केकेआरलाही हि पैसे मिळतात. यासह आयपीएल सामन्यादरम्यान ब्रँडच्या जाहिराती, सामन्यांची फीस, बीसीसीआयचा इव्हेन्ट रिव्हेन्यू या माध्यमातून शारुखला पैसे मिळतात.
(फोटो सौजन्य-टाईम्स ऑफ अहमदनगर नेटवर्क)
किंग खानला प्रत्येक आयपीएलमध्ये साधारण ७० ते ८० कोटी रुपये मिळतात.
प्रत्येक आयपीएलमधून बॉलीवूडचा किंग खान भरपूर पैसे मिळतात. मात्र हे पैसै नक्की किती आहेत, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. वेगवेगळ्या माध्यमातील रिपोर्ट्सनुसार किंग खानला प्रत्येक आयपीएलमध्ये एकूण २५० से २७० कोटींची कमाई होते. प्रत्यक्ष सामने चालू असताना काही खर्चदेखील होतो. खेळाडूंवर होणारा खर्च, मॅनेजमेंट टीमवर होणारा खर्च यामध्ये साधारण १०० कोटी रुपये खर्च होतात. म्हणजेच सर्व खर्च झाल्यावर केकेआरकडे साधारण १५० कोटी रुपये मिळतात. किंग खानची केकेआरच्या टीममध्ये ५५ टक्के हिस्सेदारी आहे. या मालकीच्या हिशोबाने किंग खानला प्रत्येक आयपीएलमध्ये साधारण ७० ते ८० कोटी रुपये मिळतात.