TIMES OF AHMEDNAGAR
लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे. तर दुसरीकडे महाआघाडीच्या प्रचाराच्या भव्य रॅलीत कुटुंबाला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. मारहाणीचा प्रकार महाविकास आघाडीचे उमेदवार माजी.आमदार लंके यांच्या कट्टर समर्थकांनी केला असल्याचा आरोप महायुतीचे उमदेवार सुजय विखे यांनी केला असून याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. कल्याण रोड परिसरातील शिवाजीनगर भागात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ दि.३ मे रोजी सायंकाळी प्रचार फेरी काढण्यात आली होती. प्रचार फेरी दरम्यान किरकोळ कारणावरून एका कटूंबात आणि लंके यांच्या समर्थकांमध्ये वाद झाले. यामध्ये लंके यांच्या समर्थकांनी कुटुंबाला मारहाण केली तसेच यामध्ये एक वृद्ध महिला जखमी झाल्याचा आरोप सुजय विखे यांनी केला आहे.