TIMES OF NAGAR
बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा तिच्या क्रिप्टीक पोस्टमुळे चर्चेत आली आहे. खरंतर अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर अभिनेत्रीचं नाव क्रिकेटपटू कुमार संगकारासोबत जोडलं जात आहे. पण आता मलायकानं सोशल मीडियावर केलेली पोस्ट काहीतरी वेगळंच सांगत आहे. मलायकाची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. मलायका अरोरानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात मलायकानं लिहिलंय की तुम्ही जितके मोठे व्हाल तितके तुम्ही संघर्षापेक्षा शांतता आणि अनादर यांच्यात योग्य अंतर राखाल. नाटक तुमच्यासाठी असह्य होतं आणि तुमच्यासाठी शांती तुमची पहिली पसंती बनते. तुम्ही स्वतःला अशा लोकांभोवती वेढू लागता जे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी, हृदयासाठी आणि आत्म्यासाठी चांगले असतात.


