विधानसभा निवडणुकांमध्ये जरांगे फॅक्टरविषयी चर्चा असताना आता मी थोड्याच दिवसाचा पाहूणा असल्याचं सांगणाऱ्या मनोज जरांगेंनी मतदानाबाबत मराठा समाजाला नेमकं कोणाच्या बाजूनं मतदान करायचं हे सांगितलंय. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका. तुम्ही मालक आहात. मी समाजाला कोणाच्याही दावणीला बांधलं नाही, असं ते म्हणालेत. मतदानाच्या दिवशी नेमकं कोणाला मतदान करायचं? मनोज जरांगेंनी मराठा बांधवांना महत्त्वाचा मेसेज दिला आहे. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावायला पाहिजे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका. तुम्ही मालक आहात. मी समाजाला कोणाच्याही दावणीला बांधलं नाही. तुमच्या मनानं तुम्हाला जे करायचे ते करा असं म्हणत आपल्या लेकराच्या बाजूनं आरक्षणाच्या बाजूनं मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. विधानसभा निवडणुकांसाठी आज राज्यातील २८८ मतदारसंघात मतदान होत आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांचा मराठवाड्यातील मतदारसंघात किती प्रभाव दिसेल याची मोठी चर्चा असताना मनोज जरांगें मतदान नेमकं कोणाला करायचं याबाबत म्हणाले, योग्य माणूस निवडण्याची हीच संधी असेल. आपल्या लेकराच्या बाजूने आरक्षणाच्या बाजूने मतदान करा.