आगामी आमदारकीला अनेक राजकीय गणिते बदलणार , कर्डिले यांनी घेतली मुंबईत जाऊन अजित पवारांची भेट….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MUMBAI | AHMEDNAGAR | DEPUTY CHIEF MINISTER AJIT PAWAR | FORMER MP DOCTOR SUJAY VIKHE | FORMER MINISTER SHIVAJI KARDILE | SHIVAJI KARDILE HAS GONE TO MUMBAI AND MET DEPUTY CHIEF MINISTER AJIT PAWAR | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
२०१९ च्या विधानसभेप्रमाणे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत गावोगावी मताचे आकडे जर पाहिले तर सत्ताधारी प्रस्थापितांविरोधात सामान्य जनतेने कौल दिल्याचे दिसले. नेते एका बाजूला आणि जनता एका बाजूला, असे चित्र आहे. २०१९ नंतरच्या निवडणुका लक्षात घेता सत्ताधारी-विरोधक असा आलटूनपालटून कल मतदारांनी देत सत्तेचा सारीपाट बदलत ठेवला आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभेला कशी गणिते असतील याचा अद्नाज राजकीय नेते घेत आहेत. त्यात आता अहमदनगर जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यातील महत्वपूर्ण नेते माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी आगामी विधानसभेच्या हिशोबाने गणिते सुरु केली आहेत.
स्त्रोत सोशल मिडिया
कर्डीले यांना राजकीय डाव टाकायचे असतील तर मग सुजय विखे यांचे काय ?
शिवाजीराव कर्डिले यांनी मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. ही भेट का घेतली ? या भेटीत काय चर्चा झाली ? याची माहिती जरी समोर आली नसली तरी आगामी विधानसभेच्या अनुशंघाने ही भेट असेल अशी चर्चा आहे. कर्डिले श्रीगोंद्यातून विधानसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा असतानाच आता ही भेट झाल्याने भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या सलगीने जर कर्डीले यांना आगामी राजकीय डाव टाकायचे असतील तर मग सुजय विखे यांचे काय ? अशी चर्चा आहे. कारण विखे यांनी नुकतेच शिवाजी कर्डिलेंना आमदार करणार असे म्हटले होते. त्यात विखे-पवार यांचे राजकीय सख्य किती आहे हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे जर पवार कर्डीले एकत्र आले तर मग विखे यांचे काय ? पवार-कर्डीले-विखे एकत्र काम करणार का ? अशा अनेक चर्चा सुरु आहेत. आगामी आमदारकीला अनेक राजकीय गणिते बदलतील यात शंका नाही. महायुती किती काळ टिकेल व अजित पवार गट किती काळ सत्तेत राहील हे सांगता येणे कठीण आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्याची आमदारकीची गणिते बदलतील अशी चर्चा आहे.