मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे यांचे कठोर उपोषण, प्रकृती चिंताजनक, उपचार घेण्यास नकार….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MARATHA RESERVATION | MANOJ JARANGE PATIL | WHILE FASTING, MANOJ JARANGE'S HEALTH DETERIORATED AND HE CLEARLY REFUSED TREATMENT | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. आता त्यांची तब्येत ढासळत चालली आहे. त्यांचा बिपी खालवत चालला असून डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना उपचाराचा सल्ला दिला आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
मनोज जरांगे यांचा पत्रकारांशी संवाद…
मनोज जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले की, कठोर उपोषण सुरू आहे. उगाचच मराठ्यांना लाडीगोडी लावत असतील गोड बोलून काटा काढायचे काम सुरू असल्याचा अंदाज मला दिसत आहे. एकीकडे तातडीने मार्ग काढू म्हणायचे आणि पाच पाच दिवस होऊ द्यायचे. हा डाव सुद्धा असू शकतो त्यांना मराठ्यांची माया असती तर चार चार दिवस उगच त्यांनी दिले नसते. मी कोणतेही उपचार घेणार नाही.
स्त्रोत सोशल मिडिया
मनोज जरांगे यांची प्रकृती चिंताजनक.
मंत्री छगन भुजबळ यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिन सोहळ्यात म्हटले की, मराठा समाजाला जे आरक्षण दिले आहे ते टिकणारे आहे. विनाकारण वाद वाढवू नये. मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो नाही, आणि तसे समजू पण नका. यावर मनोज जरांगे म्हणाले की, तू नको सांगू मला, माझ मला कळत थोड थांबा कळेल तुम्हाला, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच माझा बीपी कमी झाला आहे, असे डॉक्टर सांगत होते. उपचाराची गरज आहे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र मी कुठलेही उपचार घेणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. जरांगे यांनी पुन्हा ८ जूनपासून उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस असून गेले चार दिवस त्यांनी काही खाल्ले नसल्याने त्यांची प्रकृतीही चिंताजनक झाली आहे.