पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन या महाराष्ट्राचे शत्रू असल्याची टीका यांनी केली आहे. दोघांनाही महाराष्ट्राचा विकास झालेला नको आहे. मराठी माणसाचा विकास झालेला यांना नको असल्याचे संजय राऊत म्हणाले. सगळ्या गोष्टी हे दोघं महाराष्ट्रातून गुजरातमध्ये घेऊन जातात आणि महाराष्ट्राला कंगाल करून ठेवत असल्याचे संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार येईल, तेव्हा नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेत नसतील लिहून घ्या, असं मोठं वक्तव्य देखील संजय राऊतांनी केलं. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यापुढे तुमच्या ५० लोकांचं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही, असेही राऊत म्हणाले.
(संग्रहित दृश्य.)
महायुतीसारखी घाण महाराष्ट्रात राहता कामा नये.
शिवाजीनगर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता बहिरट यांच्या प्रचारासाठी संजय राऊत पुण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते, लोकांनी ठरवलं आहे की बहिरट यांना विजयी करायचं आहे. महाविकास आघाडी मजबुतीने पुढे चालली आहे. महायुतीसारखी घाण महाराष्ट्रात राहता कामा नये. अशी टीकाही राऊतांनी केली आहे. श्रीमंतांच्या गाडीखाली गरिबांची मुलं मारली जातात आणि श्रीमंतांच्या मुलांना वाचवण्यासाठी आमदार कामाला लागतो असे म्हणत नाव न घेता राऊतांनी सुनील टिंगरेवर टीका केली आहे. बेईमान आणि गद्दारांचा राज्य राज्यात चालू आहे, असेही ते म्हणाले. देशाच्या पंतप्रधानांना पुण्यात रिकामा खर्च्यासमोर भाषण करावे लागवे, यापेक्षा वेगळे दुर्दैव नाही असेही राऊत म्हणाले. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघं सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातून गुजरातमध्ये घेऊन जातात आणि महाराष्ट्राला कंगाल करून ठेवत आहेत. राज्यातील नेत्यांना लाज वाटली पाहिजे. जे मोदी आणि अमित शाह यांचे बूट चाटतात अशा शब्दात राऊतांनी टीका केली आहे. प्रफुल्ल पटेलांपासून अजित पवार आणि एकनाथ शिंदेपासून भावना गवळीपर्यंत सगळ्यांवर सीबीआयचे आरोप केले होते. एकनाथ शिंदेपासून अजित पवारापर्यंत सगळे डरपोक लोक आहेत ते घाबरून पळून गेल्याचे संजय राऊत म्हणाले. कोण फडणवीस कोण एकनाथ शिंदे आणि कोण अमित शाह हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे. हे शाहू फुले आंबेडकरांचे राज्य आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांच राज्य आहे. असे संजय राऊत म्हणाले. या निवडणुकीत दादागिरी करण्याचा प्रयत्न कराल तर निवडणूक आयोगाला माझा आवाहन आहे की तुम्ही लक्ष घाला. दादागिरी आणि मारामारी करण्यात आमचं आयुष्य गेलं. असहि संजय राऊत म्हणाले.