विखेंबद्दल खासदार निलेश लंकेंच्या बदललेल्या भूमिकेची जिल्ह्यातच नाही, तर राज्यात चर्चा…..
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | AHMEDNAGAR POLITICS | MP NILESH LANKA | FORMER MP SUJAY VIKHE | YASHWANTRAO GADAKH BALASAHEB VIKHE 1991 ELECTION VIKHE VS GADAKH | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
नगर जिल्ह्यातील राजकारणात गेल्या दोन-तीन वर्षांत विखे – लंके वादाने परिसिमा गाठली होती. आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे अगदी कार्यकर्त्यांच्या हमरी-तुमरीपर्यंत प्रकरण आले होते. ठरल्याप्रमाणे लंकेंनी विखेंविरोधात निवडणूक लढवली आणि जिंकलीही. निकालानंतरही १५ दिवस या दोहोंतील विळ्या-भोपळ्याचे नाते कायम राहिले होते. पण दोन दिवासांपूर्वी लंकेंचा मूड बदलला आणि त्यांनी अचानक विखेंचे गोडवे गायला सुरुवात केली आहे. मोठ्या विखे साहेबांचा आशीर्वाद घ्यायला जायचेय, असेही सांगितले आहे. लंकेंचा बदललेला मूड मेन स्ट्रिम मीडियाने व सोशल मीडियाने काही मिनिटांत राज्यभर नेला आहे. लंके व विखे या दोन्हींच्या कार्यकर्त्यांची चलबिचल वाढली आहे. या धक्क्यानंतर लगोलग दुसरा धक्का बसला, तो म्हणजे विखेंनी ४० केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची न्यायालयाकडे केलेल्या मागणीने या अगोदर विरोधक ईव्हीएमवर आक्षेप घ्यायचे. मात्र आता भाजपचे उमेदवार विखेंनीच पहिल्यांदा आक्षेप घेतल्याने चर्चा झाली आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
खासदार लंकेंची बदललेली भाषा….
आक्रमक समजल्या जाणाऱ्या लंकेंची नरमाईची भूमिका आणि विखेंची निवडणूक आयोगाकडे धाव, या दोन्ही घटनांचा ताळमेळ लावने अवघड झाले आहे. मात्र या प्रकारामुळे १९९१ च्या विखे-गडाख निवडणुकीची प्रकर्षाने आठवण होत आहे. खरेच व्हिव्हिपॅटमध्ये काही बिघाड असेल का ? मशिनमध्ये काही झोल असेल का ? विखेंच्या निर्णयाचा धसका घेतल्यामुळेच लंकेंची भाषा बदलली असेल का ? हे सगळे प्रश्न यानिमित्ताने पडले आहेत. या सगळ्या प्रकारानंतर मात्र जुन्या-जाणत्या नगरकरांना आठवली ती १९९१ ची निवडणूक. आता विखे-गडाख हे प्रकरण नेमके काय होते ते आपण जाणून घेवूयात.
स्त्रोत सोशल मिडिया
१९९१ ची निवडणूक विखे विरुद्ध गडाख….
नगर मतदारसंघात १९९१ साली काँग्रेसचे उमेदवार होते यशवंतराव गडाख तर त्यांच्या विरोधात होते अपक्ष बाळासाहेब विखे पाटील. या निवडणुकीचा १६ जून रोजी निकाल लागला होता. त्यात गडाख २.७९ लाख मतांनी विजयी झाले होते. या निकालाला विखेंनी ओरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. गडाख यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याने लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या कलम १२३(४) अन्वये त्यांची निवड अवैध ठरवून आपल्याला विजयी घोषित करावे, अशी त्यांची याचिका होती. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावरही विखेंनी चारित्र्यहननाचा आरोप केला होता. विखेंनी याचिकेत या दोघांच्या भाषणाचे पुरावेही जोडले होते.